Kitchen Tips : लिंबू पिळल्यावर त्याची साल फेकून देता? थांबा या गोष्टींसाठी करा त्याचा वापर
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
किचनमध्ये विविध पदार्थांसाठी लिंबाचा वापर होत असतो. अनेकदा लिंबाचा रस काढून झाल्यावर हे लिंबू कचराकुंडीत फेकून दिले जातात. परंतु लिंबू पिळून झाल्यावर त्याच्या साली फेकून देण्यापेक्षा त्याचा विविध गोष्टींसाठी पुनर्वापर करता येऊ शकतो. तेव्हा पिळलेल्या लिंबाच्या सालेचा वापर कोण-कोणत्या गोष्टींसाठी करता येऊ शकतो हे जाणून घेऊयात.
advertisement
1/5

लिंबाचा रस काढून झाला की त्याच्या साली किसून घ्या. लिंबाची साल तुम्ही गार्निशिंगसाठी किंवा ज्यूस तसेच सॅलेडमध्ये टाकण्यासाठी करू शकता. लिंबाच्या सालींपासून स्वादिष्ट लोणचं देखील तयार करता येऊ शकत.
advertisement
2/5
लिंबाच्या सालींचा वापर तुम्ही बेकिंग सोडा किंवा व्हिनेगर सारख्या नॅचरल क्लिनिंग घटकांसह केल्यास ते पृष्ठभागांसाठी जंतुनाशक म्हणून काम करू शकते. तसेच लिंबाला एक स्ट्रॉंग सुगंध देखील असतो त्यामुळे याचा वापर करून साफसफाई केल्यास घरात छान सुगंध दरवळेल.
advertisement
3/5
पिळून काढलेल्या लिंबाच्या कपमध्ये तुम्ही लवंग, तेल आणि कापूर पावडर घाला आणि मेणबत्तीची वात त्यात ठेऊन पेटवा. असे केल्याने घरातील डासांची समस्या दूर होईल आणि सुगंध देखील दरवळेल.
advertisement
4/5
लिंबाच्या सालीला बेकिंग सोडा आणि मीठ लावून त्याने तुम्ही किचनमधील कटिंग बोर्ड, ओटा आणि सिंक स्वच्छ करू शकता. यामुळे बॅक्टेरिया देखील दूर होईल स्वच्छ केलेल्या गोष्टी दुर्गंधीपासून मुक्त राहतील.
advertisement
5/5
लिंबू हा आंबटपणा आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ म्हणून ओळखला जातो. लिंबूमधील सायट्रिक ऍसिड नैसर्गिक ब्लीचिंग एजंट म्हणून कार्य करते ज्यामुळे तुम्ही कटिंग बोर्ड सह विविध वस्तूंची स्वच्छता करू शकता. तसेच लिंबू हा डाग काढण्यासाठी प्रभावी ठरू शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kitchen Tips : लिंबू पिळल्यावर त्याची साल फेकून देता? थांबा या गोष्टींसाठी करा त्याचा वापर