TRENDING:

benefits of jaggery गुळाचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का ?

Last Updated:
Excerpt benefits of jaggery - ऊसापासून बनवला जाणारा एक गोड पदार्थ इतकीच आपल्यास गुळाबद्दल माहिती आहे. आजच्या धकाधकीच्या युगात साखरेला पर्याय म्हणून गुळाकडे पाहिलं जातं. मात्र गुळ हा उर्जेचा उत्तम स्रोत असून त्यात अ जीवनसत्व, क जीवनसत्व, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि तांबेही भरपूर प्रमाणात आढळून येतं. पाहुयात गुळाचे फायदे काय आहेत ते.
advertisement
1/7
benefits of jaggery गुळाचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का ?
गुळ हा उर्जेचा उत्तम स्रोत आहे. गुळात अ जीवनसत्व, क जीवनसत्व, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि तांबे भरपूर प्रमाणात आढळून येतं.
advertisement
2/7
गुळ पचनासाठी चांगलं असतं. त्यामुळे ते जेवणानंतर खाल्लं जातं. गुळ पाचक एंझाइम्स सक्रिय करते आणि गॅस, आम्लता यासारख्या समस्या कमी करते. हे बद्धकोष्ठता दूर करण्यास देखील मदत करते.
advertisement
3/7
गुळामुळे शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडायला मदत होते. त्यामुळे ते लिव्हर (यकृत) टॉनिक म्हणूनही ओळखलं जातं. यामुळे लिव्हर स्वच्छ आणि फिट राहायला मदत होते.
advertisement
4/7
गूळ हा लोहाचा एक चांगला स्रोत आहे, जो हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतो. याशिवाय हे रक्त शुद्ध करते आणि रक्तक्षय टाळते. त्यामुळे ॲनिमिया झालेल्या रूग्णांना गुळ खाण्याचा सल्ला देतात
advertisement
5/7
गुळ हा उर्जेचा एक मोठा स्रोत आहे. गुळातून हळूहळू ऊर्जा बाहेर पडत असल्यामुळे तो साखरेपेक्षा जास्त आरोग्यदायी आणि फायदेशीर आहे, सारखेच्या ऐवजी गुळ शरीराला थकवा जाणवत नाही
advertisement
6/7
गुळामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असते, जे हाडं मजबूत करण्यास मदत करतात. यामुळे सांध्यातील वेदना आणि जळजळ कमी होते.
advertisement
7/7
मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी स्त्रिया गूळ खाऊ शकतात. हे स्नायूंना आराम देते आणि संप्रेरकांचे संतुलन योग्य राखण्यास मदत करते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
benefits of jaggery गुळाचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का ?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल