Red Banana Benefits: पोषकतत्त्वांचा खजिना आहेत लाल केळी, नियमितपणे खाल्ल्याने होतील अनेक फायदे
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Health Benefits of Red Banana in Marathi : केळी हे आपल्यापैकी अनेकांच्या आहारातलं एक महत्त्वाचं फळ. झाडावर लागलेली कच्ची म्हणजेच हिरवीगार केळी आणि बाजारात विकायला आलेली पिवळी केळी आपण नेहमी पाहतो. मात्र सध्या बाजारात लाल रंगाची केळी सुद्धा उपलब्ध होऊ लागली आहेत. ही केळी बाहेरून लाल रंगाची जरी असली तरीही आतून ती पिवळीच असतात. या केळ्यांना ढाका केळी असंही म्हणतात. ही लाल केळी पिवळ्या केळ्यांइतकी गोड जरी नसली तरीही, पिवळ्या केळ्यांच्या तुलनेत ती आरोग्यासाठी प्रचंड फायद्याची आहेत. जाणून घेऊयात लाल केळ्यांचे 7 आश्चर्यकारक फायदे.
advertisement
1/7

लाल केळ्यांमध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात आढळून येतं. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढून हंगामी आजारांपासून शरीराचं रक्षण व्हायला मदत होते.
advertisement
2/7
लाल केळ्यांमध्ये व्हिटॅमिन बी6 असतं, जे मेंदूमध्ये सेरोटोनिनचं प्रमाण वाढवायला मदत करतात. यामुळे तणाव आणि नैराश्याची लक्षणे कमी होऊन मूड सुधारतो. त्यामुळे सतत तणावात चिंतेत असणाऱ्यांनी लाल केळी खाणं जास्त फायद्याचं आहे.
advertisement
3/7
केळ्यांमध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात असतं. लाल केळ्यांमध्येही फायबर चांगल्या प्रमाणात आढळून येतं. यामुळे पचनक्रीया सुधारून अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठतासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
advertisement
4/7
लाल केळ्यांमध्ये कमी कॅलरीज आणि जास्त फायबर असतं, त्यामुळे पोट दीर्घकाळ वेळ भरलेलं राहतं. त्यामुळे वारंवार भूक न लागून अतिरिक्त कॅलरीज शरीरात जाण्याचा धोका टळतो आणि वजन नियंत्रणात राहायला मदत होते.
advertisement
5/7
लाल केळ्यांमध्ये नैसर्गिक साखर असते, जी त्वरित ऊर्जा प्रदान करते. त्यामुळे केळी खाल्ल्यामुळे थकवा दूर होतो. व्यायामानंतर किंवा जीमवर्कआऊट नंतर लाल केळी खाल्याने शरीराला विशेष फायदे होतात.
advertisement
6/7
लाल केळ्यांमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचा निरोगी आणि तजेलदार ठेवण्यास मदत करतात. याशिवाय, केस मजबूत आणि चमकदार बनविण्यासाठी लाल केळी महत्त्वाची ठरतात. देखील हे उपयुक्त आहे.
advertisement
7/7
लाल केळ्यांमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं, जे रक्तदाब नियंत्रित करून हृदयविकारांचा धोका टाळतात. ज्यामुळे हृदयाचं आरोग्य आणि कार्य सुधारतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Red Banana Benefits: पोषकतत्त्वांचा खजिना आहेत लाल केळी, नियमितपणे खाल्ल्याने होतील अनेक फायदे