TRENDING:

Sankrant Ukhane : संक्रांतीला वाणासोबत लुटा भरपूर आनंद, 'या' हटके उखाण्यांनी वाढावा सणाची शोभा!

Last Updated:
संक्रांतीनंतर सर्वत्र हळदीकूंकवाचा कार्यक्रम असतो, ज्यामध्ये महिला एकमेकांच्या घरी जाऊन वाण लूटतात. त्यात नवीन लग्न झालेल्या महिलांसाठी हा हळदीकूंकू खूप महत्वाचा असतो. मग अशात उखाणं घेण्याच्या कार्यक्रम तर होणाराच, मग तेच-तेच उखाणे का घ्यायची. नव्या पिढीसाठीचे नवीन उखाणे घ्या आणि सर्व महिलांमध्ये हिट ठरा.
advertisement
1/10
संक्रांतीला वाणासोबत लुटा भरपूर आनंद, 'या' हटके उखाण्यांनी वाढावा सणाची शोभा!
जीवन म्हणजे, सुख दुःखाचा खेळ…..रावांचे नाव घेते हळदीकुंकवाच्या वेळी.
advertisement
2/10
कपाळाच कुंकू जसा चांदण्याचा ठसा …. रावांचे नाव घेते हळदी कुंकवाला बसा.
advertisement
3/10
हळदी कुंकूवाला आल्या, साऱ्या महिला नटून, …. रावांनी आणलेली साडी दिसते, सर्वात उठून.
advertisement
4/10
संक्रांतीच्या सणाला असतो तिळगुळाचा मान …. रावांच्या जीवावर देते हळदीकुंकवाचं वाण.
advertisement
5/10
सर्वजण एकत्र जमलो, म्हणून आजचा दिवस आहे खास, ….रावांचे नाव घेण्याची, लागली मला आस.
advertisement
6/10
गुलाबाचे फुल दिसायला ताजे, हळदी कुंकवा दिवशी ….चे नाव घेते, सौभाग्य माझे.
advertisement
7/10
मावळला सूर्य, चंद्र उगवला आकाशी, …रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाच्या दिवशी.
advertisement
8/10
गळ्यात मंगळसूत्र, ही पतिव्रतेची खून, ….रावांचे नाव घेते …. ची सून.
advertisement
9/10
हळदी कुंकूवासाठी, जमल्या साऱ्या बायका, …. रावांचे नाव घेते, सर्वांनी ऐका.
advertisement
10/10
चांदीच्या ताटात रेशमी खण …. रावांच नाव घेते हळदी कुंकवाचा सन.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Sankrant Ukhane : संक्रांतीला वाणासोबत लुटा भरपूर आनंद, 'या' हटके उखाण्यांनी वाढावा सणाची शोभा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल