Hippophae Fruit Benefits: कॅन्सरला दूर पळवायचं आहे, ‘हे’ फळ ठरेल तुमच्यासाठी फायद्याचं, व्हिटॅमिन्सचं भांडार आहे ‘आमेश’
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Benefits of hippophae Fruits in Marathi: भारताला विविधतेत एकता असलेला देश असं म्हणतात. भारतातल्या प्रत्येक राज्यात वेगवेगळी खाद्य संस्कृती दिसून येते. भौगोलिक विविधतेमुळे प्रत्येक राज्यात औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेली वनस्पती आणि फळं आढळून येतात. जाणून घेऊयात उत्तराखंडात आढळणाऱ्या आणि कॅन्सरवर गुणकारी असलेल्या आमेश या फळाबद्दल.
advertisement
1/7

आमेश हे फळ आकाराने छोटं असून ते बोरांसारखं दिसतं. ते चवीला आंबट असतं. कच्च असताना हे फळ पिवळ्या रंगाचं असतं. पिकल्या नंतर याचा रंग केशरी किंवा नारंगी होतो.
advertisement
2/7
आमेश फळाचं शास्त्रीय नाव हिप्पोफे असून यात असलेल्या विविध औषधी गुणधर्मुंमळे अनेक विविध वस्तू बनवल्या जातात. एकट्या चीन देशात फळांपासून सुमारे पाच हजार उत्पादनं तयार केली जातात.
advertisement
3/7
जगभरात आमेश फळाच्या 5 प्रजाती आहेत आणि सगळ्याच्या सगळ्या प्रजाती ज्या एकट्या भारतातल्या आढळतात. हिमालयीन प्रदेशात 2 प्रजाती आढळून येतात. आमेशचं झाड 4 मीटर्सपर्यंत वाढू शकतं.
advertisement
4/7
संत्री, मोसंबी, आवळा, किवी आणि इतर लिंबूवर्गीय फळांच्या तुलनेत आमेश फळात व्हिटॅमिन सीचं प्रमाण खूप अधिक असतं. याशिवाय या फळात व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन बी1 ते बी6 मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे अनेक आजारांवर हे फळ गुणकारी ठरू शकतं.
advertisement
5/7
आमेश फळात कॅन्सरविरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे कर्करोगासारख्या घातक आजारांना दूर ठेवता येतं. सोप्या भाषेत सांगायचं तर नियमितपणे हे फळ खाण्याऱ्या व्यक्तींना कॅन्सर होत नाही.
advertisement
6/7
आमेश फळामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शिवाय यात असलेल्या औषधी गुणधर्मांमुळे अनेक आजारांना दूर ठेवता येतं. निरोगी आरोग्यामुळे हे फळ खाणाऱ्या व्यक्तींच्या आर्युमानात वाढ होते. त्यामुळे लवकर वृधत्व येत नाही आणि आलं तरीही वृद्धापकाळात ती व्यक्ती निरोगी राहते.
advertisement
7/7
आमेश फळामध्ये भरपूर जीवनसत्वे असतात. त्यामुळे उच्च दर्जाचं स्पोर्ट्स ड्रिंक्स आणि एनर्जी ड्रिंक्स बनवण्यासाठी या फळाचा वापर होतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Hippophae Fruit Benefits: कॅन्सरला दूर पळवायचं आहे, ‘हे’ फळ ठरेल तुमच्यासाठी फायद्याचं, व्हिटॅमिन्सचं भांडार आहे ‘आमेश’