Snake Fact : सापाचं विष कोणत्या रंगाचं असतं? 99 टक्के लोकांचा चुकीचा समज
- Published by:Devika Shinde
Last Updated:
सामान्यतः लोकांच्या मनात सापाच्या विषा संबंधीत अनेक गैरसमज असतात. बरेच लोक समजतात की सापाचं विष काळं किंवा हिरवं असतं, पण असं नाही.
advertisement
1/7

आजच्या माहितीच्या युगात सामान्य ज्ञान म्हणजे केवळ शालेय विषय नाही, तर बुद्धिमत्तेचा एक महत्त्वाचा भाग आहे. आपल्या आजूबाजूच्या जगाबद्दल जितकी माहिती असते, तितकं व्यक्तिमत्त्व अधिक आत्मविश्वासपूर्ण आणि आकर्षक वाटतं. सामान्य ज्ञान केवळ स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी नसतं, तर ते एखाद्या व्यक्तीला चतुर, विचारशील आणि जागरूक बनवतं. अशाच काही माहितीपूर्ण प्रश्नांपैकी एक मनोरंजक प्रश्न आहे. “सापाचं विष कोणत्या रंगाचं असतं?”
advertisement
2/7
सापाच्या विषाचा रंग कोणता असतो?सामान्यतः लोकांच्या मनात सापाच्या विषा संबंधीत अनेक गैरसमज असतात. बरेच लोक समजतात की सापाचं विष काळं किंवा हिरवं असतं, पण असं नाही.
advertisement
3/7
मग आता तुमच्या मनात प्रश्न उभा राहिला असेल की मग कोणता असेल?
advertisement
4/7
वस्तुस्थिती अशी आहे की सापाचं विष साधारणपणे फिकट पिवळ्या रंगाचं असतं. काही प्रजातींमध्ये ते किंचित पांढरट किंवा फिकट हिरवट छटेत दिसतं.
advertisement
5/7
विषाचा रंग सापाच्या प्रजाती आणि त्याच्या आहारानुसार थोडा फरक पडू शकतो. परंतु बहुतांश विषारी सापांमध्ये ते पिवळसर किंवा अंबर रंगाचं असतं. हे विष प्रथिने, एन्झाइम्स आणि इतर रासायनिक घटकांनी बनलेलं असतं, जे मानव किंवा प्राण्यांच्या शरीरात गेल्यावर रक्ताभिसरण किंवा स्नायू प्रणालीवर परिणाम करतात.
advertisement
6/7
सापाच्या विषाचा उपयोग काय असतो?जरी सापाचं विष घातक असतं, तरी वैज्ञानिक दृष्टीने ते अत्यंत मौल्यवान आहे. वैद्यकीय क्षेत्रात त्याचा उपयोग औषधे, पेनकिलर्स आणि लसी तयार करण्यासाठी केला जातो. काही प्रकारच्या कर्करोग, रक्तदाब आणि न्यूरोलॉजिकल आजारांच्या उपचारांसाठी सापाच्या विषातील घटकांवर संशोधनही सुरू आहे.
advertisement
7/7
अशा छोट्या पण महत्त्वाच्या माहितीमुळे आपलं सामान्य ज्ञान वाढतं आणि आपली विचारसरणी अधिक तीक्ष्ण बनते. त्यामुळे, नेहमी नवी माहिती जाणून घेण्याची सवय लावा. कारण ज्ञानच माणसाला खऱ्या अर्थाने हुशार आणि वेगळं बनवतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Snake Fact : सापाचं विष कोणत्या रंगाचं असतं? 99 टक्के लोकांचा चुकीचा समज