TRENDING:

Indian No Flying Zone : भारतातील 'या' 5 ठिकाणी आहे नो फ्लाईंग झोन! पाहा इथून का उडू शकत नाही विमान..

Last Updated:
Where Are No Flying Zone In India : तुम्हाला लांबचा प्रवास कमी वेळेत करायचा असेल तर विमान हे सर्वोत्तम पर्याय आहे. परंतु भारतात हवाई नेटवर्क अतिशय चांगले आहे आणि आता त्याचा विस्तार देखील वेगाने होत आहे. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव काही विशेष ठिकाणी आजही नो फ्लाइंग झोन आहेत. म्हणजेच या ठिकाणी आकाशातून विमान उडू शकत नाही.
advertisement
1/7
भारतातील 'या' 5 ठिकाणी आहे नो फ्लाईंग झोन! पाहा इथून का उडू शकत नाही विमान..
एखाद्या इमारतीचे किंवा परिसराचे संरक्षण करण्यासाठी नो-फ्लाय झोन स्थापन केला जातो. देशात महत्वाचे सरकारी कार्यालये, धार्मिक स्थळंन आणि काही वैज्ञानिक संशोधन केंद्र असलेल्या ठिकाणी हे नो-फ्लाइंग झोन लागू करण्यात आले आहेत. याठिकाणी सुरक्षेच्या कारणामुळे उड्डाण करण्यास परवानगी नाही. भारतात अशी कोणती ठिकाणं आहेत जाणून घेऊया.
advertisement
2/7
राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील राष्ट्रपतींचं निवासस्थान हे देशातील सर्वात संवेदनशील क्षेत्रांपैकी एक आहे. त्यामुळे राष्ट्रपती भवनाच्या वरचा संपूर्ण परिसर कायमस्वरूपी नो-फ्लाय झोन घोषित करण्यात आला आहे. येथे कोणतेही विमान, हेलिकॉप्टर किंवा ड्रोन उडवण्याची परवानगी नाही.
advertisement
3/7
तिरुमला वेंकटेश्वर मंदिर : तिरुमला वेंकटेश्वर मंदिरात दररोज लाखो भाविक येतात. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा परिसर नो-फ्लाइंग झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. येथून कोणतेही विमान, हेलिकॉप्टर किंवा ड्रोन उडवण्याची परवानगी नाही.
advertisement
4/7
संसद भवन परिसर : मध्य दिल्लीमध्ये संसद, पंतप्रधानांचे निवासस्थान, मंत्रालय कार्यालये आणि इतर अनेक महत्त्वाची सरकारी कार्यालये याच ठिकाणी आहेत. त्यामुळे या भागावरून उड्डाण करण्यास सक्त मनाई आहे. या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात असतात.
advertisement
5/7
ताजमहाल, उत्तर प्रदेश : ताजमहाल युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक आणि जगाती सर्वात प्रसिद्ध स्मारकांपैकी एक आहे. त्यामुळे कंपन, प्रदूषण किंवा अपघाताची शक्यता टाळण्यासाठी ताजमहालचा परिसर नो-फ्लाइंग झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
advertisement
6/7
भाभा अणु संशोधन केंद्र : भाभा अणु संशोधन केंद्र हे एक वैज्ञानिक रिसर्च सेंटर असल्याने हा परिसरप देखील हाय सेक्युरिटी क्षेत्र आहे. येथे अणु-संबंधित काम, संशोधन आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अत्यंत संवेदनशील प्रणाली चालवल्या जातात. त्यामुळे येथे देखील नो-फ्लाइंग झोन घोषित करण्यात आले आहे. या ठिकाणाहून कोणत्याही प्रकारच्या विमानाला उड्डाण करण्याची परवानगी नाही.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Indian No Flying Zone : भारतातील 'या' 5 ठिकाणी आहे नो फ्लाईंग झोन! पाहा इथून का उडू शकत नाही विमान..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल