TRENDING:

Beer : कॅन, पाईंट की बॉटल बिअर कशात प्यायची? एक्सपर्ट्स काय सांगतात

Last Updated:
चव, फ्रेशनेस आणि मजा हे सगळं काही प्रमाणात या निवडीवर अवलंबून असतं. चला तर मग पाहूया एक्सपर्ट्स काय म्हणतात या विषयावर आणि त्यामागचं शास्त्र काय आहे तेही जाणून घेऊया.
advertisement
1/7
Beer : कॅन, पाईंट की बॉटल बिअर कशात प्यायची? एक्सपर्ट्स काय सांगतात
बिअर हा पेयाचा प्रकार म्हणजे फक्त ड्रिंक नाही, तर रिलॅक्स होण्याचा एक अनुभव आहे. कुणी ती पार्टीत पितं, कुणी विकेंडला, तर कुणासाठी ती दिवसाच्या थकव्यानंतरचा सुकून असते. पण एक प्रश्न कायमच बिअरप्रेमींना पडतो बिअर कशात प्यावी, कॅनमध्ये, पाईंटमध्ये की बॉटलमध्ये? ज्याने टेस्ट चांगली येते आणि बिअर थंड देखील रहाते?
advertisement
2/7
चव, फ्रेशनेस आणि मजा हे सगळं काही प्रमाणात या निवडीवर अवलंबून असतं. चला तर मग पाहूया एक्सपर्ट्स काय म्हणतात या विषयावर आणि त्यामागचं शास्त्र काय आहे तेही जाणून घेऊया.
advertisement
3/7
कॅनमधली बिअर सर्वात फ्रेश आणि सोपीड्रिंकिंग एक्सपर्ट्सच्या मते, कॅनमध्ये भरलेली बिअर ऑक्सिजन आणि प्रकाशापासून सर्वाधिक सुरक्षित राहते. म्हणजेच तिची चव आणि फ्रेशनेस जास्त काळ टिकतो. कॅन पूर्णपणे बंद असतात आणि आत प्रकाश जाण्याचा प्रश्नच नसतो, त्यामुळे बिअरमधील फ्लेव्हर आणि कार्बोनेशन चांगलं राहतं. प्रवासात किंवा आउटडोअर पार्टीत कॅन बिअर सर्वात सोयीस्कर पर्याय मानला जातो. मात्र, काहींना कॅनमधून थेट पिताना मेटलिक चव जाणवते, त्यामुळे एक्सपर्ट्स सुचवतात की अशावेळी बिअर ग्लासमध्ये ओतून प्यावी.
advertisement
4/7
पाईंटमध्ये बिअरचा ‘खरा’ अनुभवज्यांना बिअर थंड प्यायला आवडते त्यांच्यासाठी पाईंटमधून पिणं हा एक चांगला अनुभव ठवू शकतो. त्यामुळे चव अधिक समृद्ध वाटते. पाइंट इतर बॉटलच्या तुलनेत महाग पडते पण थोडी बिअर असल्यामुळे तुम्ही गरजे प्रमाणे एक एक बॉटल काढून पिऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळेला थंड दारु पिण्याचा अनुभव घेता येतो.
advertisement
5/7
बॉटलमधली बिअर क्लासिक पण मर्यादित बॉटलमध्ये बिअर ठेवणं ही जुनी पण अजूनही लोकप्रिय पद्धत आहे. बॉटलचं काचेचं कव्हर बिअरला चांगलं प्रोटेक्शन देतं, पण प्रकाश (विशेषतः सूर्यप्रकाश) बिअरमधील फ्लेव्हर बिघडवू शकतो. म्हणूनच एक्सपर्ट्स सांगतात की बॉटल बिअर थेट तोंडाला लावून न पिता ग्लासमध्ये ओतून प्यावी. त्यामुळे बिअरमधील कार्बोनेशन आणि सुगंध नीट उलगडतो.
advertisement
6/7
एक्सपर्ट्स काय सांगतातड्रिंकिंग सायन्सनुसार, बिअरचा खरा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा ती योग्य तापमानात आणि योग्य प्रकारे पिण्यात येते. कॅन प्रवासासाठी आणि फ्रेशनेससाठी योग्य, तर पाईंट चव, सुगंध आणि बिअर थंड पिण्याचा अनुभव मिळवून देतो. बॉटल क्लासिक फीलसाठी आहे, पण ग्लासमध्ये तिला ओतून प्यावी.
advertisement
7/7
म्हणजेच, बिअर पिण्याचं माध्यम हे फक्त स्टाईल नव्हे, तर चवीवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे पुढच्यावेळी बिअर हातात घेताना, तिची निवड फक्त ब्रँडवर नाही, तर पात्रावरही अवलंबून ठेवा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Beer : कॅन, पाईंट की बॉटल बिअर कशात प्यायची? एक्सपर्ट्स काय सांगतात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल