तरुणांनो जीव सांभाळा! 45 पेक्षा कमी वयाच्या हेल्दी लोकांचा अचानक मृत्यू; AIIMS च्या संशोधनात धक्कादायक कारण समोर
- Published by:Priya Lad
Last Updated:
Heart Disease Sudden Death Cause : वय वर्षे 45 पर्यंत वय म्हणजे तारुण्याचं वय. पण या वयापर्यंतच्या लोकांचे अचानक मृत्यू होत आहेत. आश्चर्य म्हणजे अगदी हेल्दी लोक जे अचानक बेशुद्ध होत आहेत आणि त्यांचा जीव जात आहे. नवी दिल्लीतील एम्सने या अचानक झालेल्या तरुणांच्या मृत्यूचा अभ्यास केला. तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली आहे.
advertisement
1/7

एम्स नवी दिल्ली येथील पॅथॉलॉजी आणि फॉरेन्सिक मेडिसीन विभागांने मे 2023 ते एप्रिल 2024 या एक वर्षात झालेल्या आकस्मिक मृत्यूंच्या प्रकरणांचा अभ्यास केला. इंडियन कान्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या प्रकल्पाचा भाग म्हणून इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये या महिन्यात हा अभ्यास प्रकाशित झाला.
advertisement
2/7
एम्सने केलेल्या अभ्यासात एका वर्षात अचानक झालेल्या मृत्यूंमध्ये निम्म्याहून अधिक मृत्यू 45 वर्षांपेक्षा कमी लोकांचे झाल्याचं समोर आलं आहे. त्यापैकी बरेच जण निरोगी होते. जे घरी किंवा प्रवासात अचानक बेशुद्ध झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.
advertisement
3/7
रिपोर्टनुसार 2214 पोस्टमॉर्टेमपैकी 180 प्रकरणं म्हणजे 8.1 टक्के प्रकरणं अचानक मृत्यूची होती. त्यापैकी 103 मृत 18-45 वयोगटातील होते. म्हणजे 57% असे लोक ज्यांचं सरासरी वय 33.6 वर्षे होतं आणि यात पुरुषांचं प्रमाण जास्त होतं.
advertisement
4/7
बहुतेक मृत्यू घरी किंवा प्रवासादरम्यान झाले, बहुतेकदा रात्री किंवा पहाटे. अचानक बेशुद्ध पडणं हे कुटुंबांनी नोंदवलेलं सर्वात सामान्य लक्षण होतं, त्यानंतर छातीत दुखणं आणि श्वास घेण्यास त्रास होणं. फक्त काही तरुणांना मधुमेह किंवा उच्च रक्तदाबसारखे आजार होते. या वयोगटात लसीकरणाचं प्रमाण जास्त होतं. पण अचानक मृत्यू आणि लसीकरणाचा कोणताही संबंध आढळलेला नाही.
advertisement
5/7
या सगळ्यांच्या अचानक मृत्यूचं कारण हृदयरोग असल्याचं समोर आलं आहे. एम्सच्या फॉरेन्सिक मेडिसीन विभागातील आणि अभ्यासाचे लेखक डॉ. सुधीर गुप्ता म्हणाले की, तरुणांमध्ये अचानक होणाऱ्या मृत्यूंपैकी 42.6% मृत्यू हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजारांमुळे होतात. बहुतेकांना गंभीर ब्लॉकेजसह एडव्हान्स कोरोनरी आर्टरी रोग होता, बहुतेकदा कोणतंही पूर्व निदान न होता जीवघेणा हृदयरोग शांतपणे वाढला होता. न्यूमोनिया, क्षयरोग आणि श्वासोच्छवास यासारख्या श्वसनाच्या कारणांमुळे पाचपैकी एक मृत्यू झाला.
advertisement
6/7
पीएसआरआय हार्ट इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. के. के. तलवार म्हणाले की, हा अभ्यास अकाली कोरोनरी आर्टरी रोगात वाढ होत असल्याचं अधोरेखित करतो. त्यांनी नमूद केलं की अनेक अस्पष्ट मृत्यू वारशाने मिळालेल्या हार्टच्या इलेक्ट्रिकल डिसॉर्डरमुळे होतात. जे नियमित शवविच्छेदन शोधू शकत नाहीत. यासाठी आनुवांशिक चाचणी आणि कुटुंब तपासणीची गरज असते.
advertisement
7/7
संशोधकांनी असा इशारा दिला आहे की तरुणांमध्ये अचानक मृत्यू बहुतेकदा अंतर्निहित आजारामुळे होतो, त्यामुळे लवकर निदान होणं महत्त्वाचं ठरतं. डॉ. के. के. तलवार यांनी लवकर प्रतिबंधात्मक तपासणी, तंबाखू आणि अल्कोहोलचं सेवन न करणं आणि तरुणांमध्ये नियमित हृदय मूल्यांकन यावर भर दिला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
तरुणांनो जीव सांभाळा! 45 पेक्षा कमी वयाच्या हेल्दी लोकांचा अचानक मृत्यू; AIIMS च्या संशोधनात धक्कादायक कारण समोर