Exercise for diabetes डायबिटीसला दूर करायचं आहे, मग करा करा ‘हे’ साधे सोपे व्यायाम
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Exercise for diabetes बदलत्या जीवनशैलीमुळे जडलेला आजार अशी डायबिटीसची ओळख. जगभरातल्या अनेक व्यक्ती डायबिटीसमुळे त्रस्त आहेत. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि अनुवांशिकता यामुळे अनेकांना डायबिटीस अर्थात मधुमेहाची लागण होतो. टाईप 2 डायबिटीस औषधांनी नियंत्रणात राहतो. मात्र काही साधे सोपे व्यायाम केल्यास तुम्ही डायबिटीसला दूर ठेवू शकता.
advertisement
1/7

चालणं हा सर्वात सोपा आणि सर्वांग सुंदर व्यायाम आहे. जो केव्हाही आणि कुठेही करता येतो. दररोज चालण्याचा व्यायाम केल्याने डायबिटीस नियंत्रणात येऊ शकते.
advertisement
2/7
दोरी उड्या हा घरी किंवा बाहेर कुठेही करता येण्याजोगा एक सोपा व्यायाम आहे. दोरीउड्यांमुळे जास्त कॅलरीज बर्न होत असल्याने या व्यायामाचा फायदा फक्त डायबिटीसच नाही तर रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल कमी करायलाही होतो.
advertisement
3/7
दररोज सायकल चालवल्याने रक्तातली साखर कमी होऊन डायबिटीस नियंत्रणात राहते. सायकलिंग हा कार्डियो एक्सरसाइजचा एक प्रकार आहे ज्यामुळे वजनही कमी व्हायला मदत होते.
advertisement
4/7
डायबिटीसच्या रूग्णांसाठी पोहणे हा सर्वात उत्तम व्यायाम आहे. पोहण्यामुळे कॅलरीज जास्त बर्न होतात. त्यामुळे तुम्ही फिट ठेवण्यासोबतच, ब्लड शुगरही नियंत्रणात राहते.
advertisement
5/7
दररोज विशिष्ट योगासने केल्याने फक्त डायबिटीसच नाही तर मानसिक तणाव सुद्धा दूर होतो. झोप सुद्धा चांगली लागते त्यामुळे डायबिटीसच्या रुग्णांना योगासने करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
advertisement
6/7
ज्या व्यक्तींना बदलत्या जीवनशैलीमुळे किंवा अनुवंशीकतेमुळे तरूणपणातच डायबिटीसची लागण झालीये त्यांच्यासाठी मैदानी खेळ उत्तम व्यायाम आहे. मात्र ज्यांचं वय झालंय त्यांनी मैदानी खेळ काळजीपूर्वक खेळावेत.
advertisement
7/7
टेन्शन हे डायबिटीसचं एक कारण आहे. त्यामुळे जर तुम्हाला डायबिटीस झाला असेल आणि तुम्हाला तो हसत खेळत दूर करायचा आहे त्यांच्यासाठी नाच हा एक चांगला पर्याय असू शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Exercise for diabetes डायबिटीसला दूर करायचं आहे, मग करा करा ‘हे’ साधे सोपे व्यायाम