Weight Loss Without Exercise : व्यायामाशिवाय करू शकाल वजन कमी.. 'या' नैसर्गिक उपायांनी मिळवा स्लिम-ट्रिम फिगर!
Last Updated:
Weight Loss Tips Without Exercise : व्यायामाशिवाय तुम्ही वजन कमी करू शकता, हे आम्ही तुम्हाला सांगितले तर तुम्हाला विश्वास बसेल का? हे अवघड वाटत असले तरी अशक्य नाही. वजन कमी करण्यासाठी अनेक नैसर्गिक उपायही फायदेशीर ठरू शकतात. आज आम्ही तुम्हाला संच काही सोपे आणि प्रभावी उपाय सांगणार आहोत.
advertisement
1/7

फिट राहण्यासाठी आणि लवकर चांगले परिणाम मिळवण्यासाठी व्यायाम करणे हा अजूनही सर्वोत्तम मार्ग आहे. मात्र तेच ध्येय गाठण्यासाठी काही इतर पद्धतीही आहेत. तुमचे काम सोपे करण्यासाठी आम्ही नैसर्गिक उपायांची यादी तयार केली आहे, जी तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करेल.
advertisement
2/7
लिंबू : वजन कमी करण्याचा सर्वात सुप्रसिद्ध नैसर्गिक उपाय जो खरोखरच प्रभावी आहे, तो म्हणजे लिंबू पाणी. मात्र सांधेदुखी किंवा अति-आम्लपित्ताचा त्रास असलेल्या व्यक्तींनी तो टाळावा. परंतु, इतरांसाठी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत लिंबू घालून पिणे खूप फायदेशीर ठरू शकते.
advertisement
3/7
काळी मिरी : सकाळी लिंबू पाण्यासोबत एक चिमूटभर काळी मिरी मिसळल्यास वजन कमी होण्यास मदत होते. हे पचन आणि चयापचय क्रिया वाढवते, ज्यामुळे आपल्या शरीरात कमी चरबी तयार होते.
advertisement
4/7
आवळा : हे फळ थायरॉईड समस्या, मधुमेह आणि बद्धकोष्ठता यासह विविध आजारांसाठी अद्भुत आहे. त्याची आंबट चव चरबी कमी करण्यास मदत करते.
advertisement
5/7
कोमट पाणी : कोमट पाणी, अगदी सामान्य गोष्ट वाटते. परंतु, हेदेखील तुम्हाला वजन कमी करण्यासाठी खूप मदत करू शकते. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, जेवण करण्यापूर्वी सुमारे 30 मिनिटे अर्धा लिटर पाणी प्यायल्याने भूक कमी होते आणि कॅलरीजचे सेवनही घटते.
advertisement
6/7
कॉफी प्या : हे एक सत्य आहे की, गोड नसलेली कॉफी हे अँटीऑक्सिडंट्स आणि इतर मौल्यवान घटकांनी समृद्ध असे आरोग्यदायी पेय आहे. कॉफीचे सेवन ऊर्जा पातळी वाढवून आणि बर्न झालेल्या कॅलरीजची संख्या वाढवून वजन कमी करण्यास मदत करू शकते.
advertisement
7/7
पुरेशी झोप घ्या : वजन कमी करण्यासाठी पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे आहे. अभ्यासानुसार, ज्यांना पुरेशी झोप मिळत नाही अशा व्यक्तींना, पुरेशी झोप घेणाऱ्यांपेक्षा लठ्ठपणा येण्याची शक्यता 55% जास्त असते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Weight Loss Without Exercise : व्यायामाशिवाय करू शकाल वजन कमी.. 'या' नैसर्गिक उपायांनी मिळवा स्लिम-ट्रिम फिगर!