TRENDING:

Health Risk Of The Day : सकाळी उठल्या उठल्या लगेच अंघोळ केल्याने काय होतं?

Last Updated:
Bathing Time : अनेकांना सकाळी उठल्या उठल्या लगेच अंघोळ करायची सवय असते. पण याचा शरीरावर, आरोग्यावर काय परिणाम होतो याचा विचार केला आहे का?
advertisement
1/7
Health Risk Of The Day : सकाळी उठल्या उठल्या लगेच अंघोळ केल्याने काय होतं?
बऱ्याच लोकांच्या ऑफिसची वेळ सकाळची असते. ऑफिसला जाण्याच्या तासभर आधी उठून झटपट तयार केली जाते. मग उठल्या उठल्या लगेच अंघोळ असते. पण तुम्ही अंघोळ कधी करता याचा परिणाम तुमच्या आरोग्यावरही होत असतो.
advertisement
2/7
जर्नल ऑफ क्लिनिकल गॅस्ट्रोएनटेरॉलॉजीमध्ये 2015 साली प्रकाशित अभ्यासानुसार सकाळी उठल्या उठल्या अंघोळ केल्याने पचनप्रणालीवर परिणाम होतो, विशेषतः जर तुम्ही रिकाम्या पोटी अंघोळ करत असाल. अंधोळीआधी खाल्ल्याने पचनप्रणालीला फायदा होऊ शकतो.
advertisement
3/7
जर्नल ऑफ सर्केडिअन रिदम 2019 च्या संशोधनानुसार सकाळी 7 ते 8 ही वेळ अंघोळीसाठी उत्तम आहे. कारण या वेळेला शरीराचं तापमान आणि रक्तदाब सामान्य असतं.
advertisement
4/7
युरोपियन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये 2017 साली प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार उठल्यानंतर 30 मिनिटांनी अंघोळ केल्याने शरीराला फायदा होता. कारण या वेळेत रक्तदाब, हृदयाचे ठोके सामान्य असतात.
advertisement
5/7
हेल्थलाइन 2020 मध्ये प्रसिद्ध अभ्यासानुसार काही तज्ज्ञांच्या मते, नाश्ता केल्यानंतर अंघोळ करणं चांगलं, कारण यावेळी शरीराला ऊर्जा मिळते आणि पचनप्रणाली सक्रीय होते.
advertisement
6/7
स्लिप हेल्थमध्ये 2018 प्रसिद्ध अभ्यासानुसार सकाळी उठताच अंघोळ केल्याने झोपेच्या गुणपत्तेवर परिणाम होतो. जर तुम्ही रात्री उशिरापर्यंत जागत असाल तर. एका अभ्यानुसार सकाळच्या दिनचर्येत बदल केल्याने झोपेची गुणवत्ता सुधारू शकते.
advertisement
7/7
सूचना : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. अंघोळ कधी करायची हे वैयक्तिक अनुभव आणि आरोग्यावरही अवलंबून आहे. त्यामुळे अवलंब करण्यापूर्वी याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Health Risk Of The Day : सकाळी उठल्या उठल्या लगेच अंघोळ केल्याने काय होतं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल