TRENDING:

Health Risk Of The Day : दररोज फक्त भातच खाल्ला तर काय होईल?

Last Updated:
What happend if eat only rice daily : आपल्याला भात हवाच, भात खाल्ल्याशिवाय जेवल्यासारखं वाटत नाही असं म्हणणारे कितीतरी लोक आहेत. पण दररोज फक्त भातच खाल्ला तर त्याचा शरीरावर, आरोग्यावर कसा परिणाम होईल तुम्ही विचार केला आहे का?
advertisement
1/7
Health Risk Of The Day : दररोज फक्त भातच खाल्ला तर काय होईल?
भात हा भारतीय आहारातील मुख्य पदार्थ. भारतात कोणत्याही ठिकाणी जा तुम्हाला भात खायला मिळेल. भाताचे प्रकार आणि ते बनवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. पण आपल्याला भात हवाच, भात खाल्ल्याशिवाय जेवल्यासारखं वाटत नाही असं म्हणणारे कितीतरी लोक आहेत. या लोकांना एकवेळ चपाती, भाकरी नाही दिली चालेल पण भात मात्र हवा.
advertisement
2/7
विचार करा जर एखाद्याने दररोज फक्त भातच खाल्ला तर काय होईल. याबाबत रिसर्चही करण्यात आले आहेत. त्यानुसार दररोज फक्त भात खाल्ल्याने आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.
advertisement
3/7
भातामध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स जास्त असते, ज्यामुळे ब्लड शुगर म्हणजे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार भाताच्या अधिक सेवनाने टाइप2 मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
advertisement
4/7
भातामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असतं, ज्यामुळे वजन वाढू शकतं. जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार भात जास्त खाल्ल्याने वजन वाढतं आणि लठ्ठपणाचा धोका बळावतो.
advertisement
5/7
काही ठिकाणी पिकवलेल्या तांदळात आर्सेनिकचं प्रमाण जास्त असू शकते, जे आरोग्यासाठी हानिकारक आहे. नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ एनवायर्नमेंटल हेल्थ साइन्सेजनुसार, आर्सेनिक युक्त भात खाल्ल्याने आरोग्याला हानी पोहोचू शकते.
advertisement
6/7
भातात इतर पोषक तत्व नसतात. त्यामुळे फक्त भात खाल्ल्याने शरीरात व्हिटॅमिन आणि मिनरल्सची कमतरता होऊ शकते.
advertisement
7/7
या दुष्परिणामांपासून वाचायचं असेल तर भाताला संतुलित आहाराचा भाग बनवा. भातासोबत इतर वेगवेगळ्या पदार्थांच्या, पोषक घटकांनीयुक्त खाद्यपदार्थांचं सेवन करा. (सर्व फोटो : AI Generated)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Health Risk Of The Day : दररोज फक्त भातच खाल्ला तर काय होईल?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल