Wedding Rituals : नवरा-बायको सत्यनारायणाच्या पूजेशिवाय येत नाहीत एकत्र; नेमकी काय आहेत पूजेची कारणं?
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
येत्या काही महिन्यात लग्नाचे अनेक शुभ मुहूर्त असल्याने बरीच जोडपी लग्नबंधनात अडकत आहेत. लग्नानंतर नव वर वधू एकत्र सत्यनारायणाच्या पूजेला बसतात. परंतु लग्न झाल्यावर सत्यनारायणाची पूजा का केली जाते याची कारण जाणून घेऊयात.
advertisement
1/5

मराठी पद्धतीमध्ये लग्न झाल्यावर अनेक घरांमध्ये लग्नानंतर लगेचच सत्यनारायणाची पूजा घालण्याची पद्धत आहे. आजही बहुतेक लोक ही पद्धत पाळतात. परंतु यामागची नेमकी कारण कोणती आहेत याबाबत फार कमी जणांना ठावूक असते.
advertisement
2/5
कोरा या साईटवर देखील लग्नानंतर सत्यनारायणाची पूजा का केली जाते याविषयी माहिती काही युझर्सनी सांगितली आहे. सुरेश जोशी नावाचे युझर सत्यनारायणाचे महत्व सांगताना म्हणतात की, नवं वर वधू गृहस्थाश्रमात प्रवेश करताना देवा प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही पूजा केली जाते.
advertisement
3/5
सुरेश जोशी पुढे सांगता की, देवाच्या कृपादृष्टीमुळे नवीन जोडपं हे गृहस्थाश्रमात प्रवेश करत असतं, तेव्हा लग्नात पाहुणे मंडळींना गोडधोडाचे जेवण दिले जाते किंवा त्यांचा सत्कार केला जातो तसाचं सत्कार आणि गोडधोड देवाला देखील द्यावं यासाठी सत्यनारायणाची पूजा केली जाते.
advertisement
4/5
महाराष्ट्रातील काही ठिकाणी लग्नानंतर सत्यनारायणाची पूजा झाल्याशिवाय नवरा नवरीला एकत्र येऊ दिल जात नाही अशी प्रथा आहे. या प्रथेमागे त्या त्या भागातील विविध कारण आहेत.
advertisement
5/5
लग्नानंतर कुलदैवत कुलदेवीचे दर्शन घेऊन संसाराची शुभ सुरुवात करण्यासाठी सत्यनारायण पूजा केली जाते. तसेच सत्यनारायणाची पूजाचं नाही तर लग्नानंतर देवदर्शनाला जाण्याची देखील प्रथा महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Wedding Rituals : नवरा-बायको सत्यनारायणाच्या पूजेशिवाय येत नाहीत एकत्र; नेमकी काय आहेत पूजेची कारणं?