TRENDING:

लिपस्टिक लावलीये असं वाटणारच नाही, एकदम नॅचरल दिसतील ओठ, वापरा सोपी पद्धत!

Last Updated:
पूर्वी फक्त लग्न सोहळ्यात किंवा एखाद्या विशिष्ट कार्यक्रमात लिपस्टिकचा वापर व्हायचा. आता मात्र अनेक स्त्रिया ओठांना दररोज लिपस्टिक लावतात. काहीजणींना डार्क लिपस्टिक आवडते, तर काहीजणींना लिपस्टिक लावलेली असतानाही आपले ओठ नॅचरल दिसावे असं वाटतं. त्यासाठी लिपस्टिक नेमकी कशी लावावी, हेच आज आपण जाणून घेणार आहोत.
advertisement
1/5
लिपस्टिक लावलीये असं वाटणारच नाही, एकदम नॅचरल दिसतील ओठ, वापरा सोपी पद्धत!
ओठांवर लिपस्टिक लावली आहे असं तेव्हाच वाटतं जेव्हा आपण एखादा डार्क किंवा आपल्या स्किनपेक्षा वेगळा शेड निवडतो. त्यामुळे आपल्या ओठांच्याच रंगाची आणि जरा आपल्या चेहऱ्यावर ग्लो येईल अशा शेडची लिपस्टिक निवडावी.
advertisement
2/5
बऱ्याचदा लिपस्टिक ओठांवर टिकत नाही, काहीवेळा लिपस्टिकमुळे ओठ फाटल्यासारखे दिसतात. अशावेळी ओठ नॅचरल दिसत नाहीतच, परंतु विचित्र दिसू लागतात.
advertisement
3/5
लिप बाममुळे ओठ छान मऊ राहतात. जर लिपस्टिक लावण्यापूर्वी लिप बाम लावलं तर लिपस्टिक बराच वेळ टिकू शकते. तसंच लिप लायनरमुळे ओठांवर मजबूत बेस तयार होतो. ज्यामुळे लिपस्टिकचा रंग ओठांवर व्यवस्थित सेट होतो, जो भरपूर वेळ टिकून राहू शकतो. यामुळे लिपस्टिक पसरतही नाही.
advertisement
4/5
लिपस्टिक लावल्यानंतर ओठांवर हलक्या हातानं टॅप करावं, लिपस्टिक सेट करून घ्यावी. यामुळे लिपस्टिक टिकतेच, शिवाय तो ओठांचा नॅचरल रंग आहे असं वाटतं. त्याचबरोबर लिपस्टिक लावल्यानंतर टिश्यू पेपरनं ओठ हलकेसे दाबावे आणि वरून हलक्या हातांनी पावडर लावावी. यामुळे लिपस्टिकचा तो शेड बराच वेळ तसाच राहतो.
advertisement
5/5
जर लिपस्टिक जास्त चमकदार किंवा जाड वाटत असेल तर ब्लॉटिंग पेपरचा वापर करावा, ज्यामुळे लिपस्टिकमधलं एक्स्ट्रा ऑइल आणि चमक निघून जाते, मग लिपस्टिकचा मूळ रंग जसाच्या तसा राहतो. आजकाल बाजारात लाँग लास्टिंग आणि मॅट फिनिशिंग लिपस्टिक उपलब्ध असतात. त्यातून अशीच लिपस्टिक निवडावी जी बराच काळ टिकून राहिल आणि काही वेळाने डल दिसणार नाही. महत्त्वाचं म्हणजे लिपस्टिकचा शेड हा आपल्या रंगानुसारच निवडावा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
लिपस्टिक लावलीये असं वाटणारच नाही, एकदम नॅचरल दिसतील ओठ, वापरा सोपी पद्धत!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल