Ahmednagar News : वाळू चोरून पुष्पाभाऊ स्टाईल पळाले, पण पिकअपसह 75 फूट खोल विहिरीत बुडाले, नगरमधील घटना
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात आज पहाटे अवैध वाळू वाहतूक करणारा पिकअप थेट विहीरीत कोसळला. (हरीष दिमोटे, प्रतिनिधी)
advertisement
1/5

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात आज पहाटे अवैध वाळू वाहतूक करणारा पिकअप थेट 75 फुट खोल विहीरीत कोसळला आहे.
advertisement
2/5
ड्रायवरसह पाचजण गाडीत होते. चौघांनी बाहेर पडत आपला जिव वाचवला. मात्र, ड्रायव्हर गाडीसह विहीरीत बुडाला आहे.
advertisement
3/5
पोलिसांनी गाडीचा पाठलाग करत असताना हा अपघात झाल्याची माहीती असून गाडी बाहेर काढण्यात आली आहे. या घटनेत वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणारे 3 मजूर विहिरीतून बाहेर येत थोडक्यात वाचले.
advertisement
4/5
तर पिकअपचा चालक गोरख नाथा खेमनर (वय 23, रा डिग्रस, ता संगमनेर) हा मात्र विहिरीतील पाण्यात बुडाला आहे.
advertisement
5/5
ही घटना राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक शिवारात शनिवारी पहाटे चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/अहमदनगर/
Ahmednagar News : वाळू चोरून पुष्पाभाऊ स्टाईल पळाले, पण पिकअपसह 75 फूट खोल विहिरीत बुडाले, नगरमधील घटना