TRENDING:

Marathwada Weather Update: मराठवाड्यात पुन्हा हवापालट, IMD चं महत्त्वाचं अपडेट, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?

Last Updated:
Marathwada Weather Update: गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात थंडीची लाट निर्माण झाली होती. आता हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
advertisement
1/5
मराठवाड्यात पुन्हा हवापालट, IMD चा अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?
डिसेंबर महिन्यात वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. राज्यात थंडीचा जोर काहीसा ओसरला असून किमान तापमानात वाढ झाली आहे. मात्र मराठवाड्यात गारठा कायम आहे.
advertisement
2/5
मराठवाड्यातील काही ठिकाणी तापमान 12 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. आज हवामान सूर्यप्रकाशित राहणार असून थंडीची तीव्रता काहीशी कमी जाणवेल. तर पुढच्या आठवड्यामध्ये मात्र तापमानात अजून घट होण्याचा अंदाज आहे.
advertisement
3/5
बीड आणि धाराशिव मध्ये किमान तापमान हे 13 अंश सेल्सिअस एवढे असेल. या ठिकाणी आज हवामान हे कोरडे असेल. परभणीत किमान तापमान 16 अंश सेल्सिअस राहील. पण येत्या काही दिवसांत तपमानात पुन्हा घट होणार आहे.
advertisement
4/5
नांदेड, हिंगोलीत 16 अंश, लातूरमध्ये 15 अंश तर छत्रपती संभाजीनगरमध्ये किमान तापमान 14 अंशांवर राहील. तर कमाल तापमान 30 अंशांच्या घरात राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
5/5
दरम्यान, मराठवाड्यात एकाच महिन्यात हवामानाची विचित्र स्थिती पाहायला मिळत आहे. सुरुवातीला अवकाळी पाऊस, कडक ऊन आणि थंडीचा कडाका अशा वातावरणामुळे लोकांना आरोग्याच्या समस्या जाणवत आहेत. तर शेती पिकांना देखील फटका बसत असून शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/औरंगाबाद/
Marathwada Weather Update: मराठवाड्यात पुन्हा हवापालट, IMD चं महत्त्वाचं अपडेट, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल