फलटणच्या सभेनंतर दुग्धाभिषेक अन् रणजितसिंह नाईक निंबाळकर ढसाढसा रडले, PHOTOS
- Published by:Sachin S
 
Last Updated:
भाजपचे नेते आणि माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची फलटणमध्ये जाहीर सभा पार पडली. ही सभा संपल्यानंतर महिलांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना दुग्धाभिषेक घातला. यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना अश्रू अनावर झाले होते.
advertisement
1/8

 भाजपचे नेते आणि माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची फलटणमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत त्यांनी सुषमा अंधारे यांना कुणी वाईट बोलले असेल, त्यांच्याविषयी आमच्या कार्यकर्त्यांपैकी कुणी अपशब्द बोलले असेल तर क्षमा मागतो, अशी जाहीर माफी मागितली. तर सभा संपल्यानंतर मात्र निंबाळकर ढसाढसा रडले.
advertisement
2/8
 गेल्या काही दिवसात आपल्याविरोधात बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचं रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी म्हटलंय. ही सभा संपल्यानंतर महिलांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना दुग्धाभिषेक घातला.
advertisement
3/8
 सभा संपल्यानंतर स्टेजजवळ महिलांनी एकच गर्दी केली. यावेळी निंबाळकर यांची स्थानिक महिलांनी दृष्ट काढली. हे पाहून त्यांचे समर्थक भारावून गेले होते.
advertisement
4/8
 सभा संपल्यानंतर महिलांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना दुग्धाभिषेक घातला. यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना अश्रू अनावर झाले होते.
advertisement
5/8
 यावेळी निंबाळकर यांना अश्रू अनावर झाले. निंबाळकर यावेळी ढसाढसा रडले. हे पाहून त्यांच्या कुटुंबीयांचाही अश्रूंचा बांध फुटला.
advertisement
6/8
 दरम्यान, जाहीर सभेत निंबाळकर यांनी जोरदार भाषण केलं. 'शेर को धमका सकते है, डरा नही सकते, या तालुक्याची बदनामी झाली, ती तुमच्यामुळे झाली अशा शब्दात रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी रामराजेंना जोरदार टोला लगावला.
advertisement
7/8
 मी गुन्हा केला नाही तर कुणाच्या बापाला घाबरत नाही. 'आम्ही केस केलेला एकही मुकादम फलटणमधील त्या डॉक्टरताईंना भेटला नव्हता', महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचं आम्हालाही दु:ख झाल्याचंही त्यांनी म्हटलंय.
advertisement
8/8
 तर चुकीचं काम करत नाही म्हणून तुम्ही माझ्यासोबत आहात असं म्हणत स्वत:चीच पाठ थोपटून घेतली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
फलटणच्या सभेनंतर दुग्धाभिषेक अन् रणजितसिंह नाईक निंबाळकर ढसाढसा रडले, PHOTOS