TRENDING:

Marathwada Weather Update: उत्तरेकडून थंड वारे, मराठवाड्यात Cold Wave अलर्ट, कसं असेल डिसेंबरमध्ये हवामान?

Last Updated:
Weather Forecast: उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. मराठवाड्यात देखील गारठा वाढला आहे.
advertisement
1/5
उत्तरेकडून थंड वारे, मराठवाड्यात Cold Wave अलर्ट, कसं असेल डिसेंबरमध्ये हवामान?
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडीची लाट निर्माण झाली आहे. काही जिल्ह्यात तापमानाचा पारा कमालीचा घसरला आहे. मराठवाड्यात देखील नोव्हेंबर अखेर थंडीची तीव्रता वाढली आहे.
advertisement
2/5
मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत डिसेंबर महिन्यात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. सध्या मराठवाड्याचा पारा 11 अंशापर्यंत घसरला असून काही ठिकाणी थंडीची लाट येण्याचा अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
3/5
नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यात किमान तापमानात घट झाली असून ते 13 अंश सेल्सिअस एवढे असेल. जालना, हिंगोली आणि लातूर या जिल्हांत किमान तापमान 14 अंश सेल्सिअस राहील. परभणी आणि बीड या जिल्हात थंडीचा कडाका वाढला असून पारा 12 अंशांवर आहे.
advertisement
4/5
छत्रपती संभाजीनगरमध्ये कमालीची थंडी जाणवत आहे. किमान तापमानात मोठी घट झाली असून आज 12 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहील. तर कमाल तापमान 26 अंश सेल्सिअस राहील. शहरात सकाळी धुक्याची चादर पसरल्याचे दिसत असून गारठा कायम आहे.
advertisement
5/5
मराठवाड्यातील हवामानातील बदलांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घेण्याची गरज आहे. तर वाढत्या थंडीमुळे आरोग्याच्या समस्याही निर्माण होण्याचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांनी आपले आरोग्य जपावे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Weather Update: उत्तरेकडून थंड वारे, मराठवाड्यात Cold Wave अलर्ट, कसं असेल डिसेंबरमध्ये हवामान?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल