TRENDING:

Marathwada Weather Update: मराठवाड्यात गारठा वाढला, परभणीत कडाक्याची थंडी, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?

Last Updated:
Marathwada Weather Update: डिसेंबरच्या सुरुवातीलाच अवकाळी संकटाचा फटका बसलेल्या मराठवाड्यातील हवामानात पुन्हा बदल जाणवत आहेत. आता गारठा वाढला असून काही ठिकाणी तापमान 11 अंशांपर्यंत घसरलं आहे.
advertisement
1/5
मराठवाड्यात गारठा वाढला, परभणीत कडाक्याची थंडी, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?
राज्यात थंडीचा कडाका वाढला असून काही ठिकाणी तापमानात मोठी घट झालीये. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच मराठवाड्यावर अवकाळी संकट आले होते. त्यानंतर मात्र हवामानात बदल जाणवत असून आता गारठा वाढला आहे.
advertisement
2/5
गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात सुद्धा थंडीचा जोर वाढला आहे. काही ठिकाणी पारा 11 अंशांच्या खाली घसरला आहे. सर्वात कमी तापमानाची नोंद परभणी जिल्ह्यात झालीये. आज देखील परभणीत तापमान 11 अंशांवर राहणार आहे.
advertisement
3/5
मराठवाड्यात आज कोरडे हवामान असणार आहे. बीड आणि धाराशिव मध्ये किमान तापमान हे 12 अंश सेल्सिअस असेल. पुढील काही दिवस सुद्धा हेच किमान तापमान कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
advertisement
4/5
नांदेड, हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यामध्ये किमान तापमान हे 14 अंश सेल्सिअस असेल. या जिल्ह्यामध्ये पुढच्या आठवड्यापासून तापमानामध्ये घट होईल, असा अंदाज आहे. या ठिकाणी आज हवामान कोरडं असेल.
advertisement
5/5
छत्रपती संभाजीनगरमध्ये किमान तापमान 12 अंश तर कमाल 29 अंशांवर राहली. शहरात सकाळी धुके जाणवत असून दिवसभर हलकी थंडी आहे. हवामानातील बदलांमुळे शेती पिकांना फटका बसत असून शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Weather Update: मराठवाड्यात गारठा वाढला, परभणीत कडाक्याची थंडी, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल