TRENDING:

ऊन, थंडी अन् पावसाचा खेळ, मराठवाड्यातील आजचा हवामान अंदाज पाहिला का?

Last Updated:
Weather Forecast: दिवाळीला अवघे काही दिवस बाकी असून मराठवाड्यात परतीच्या पावसाचा मुक्काम कायम आहे. आज पुन्हा तुरळक पावसाचा अंदाज आहे.
advertisement
1/5
ऊन, थंडी अन् पावसाचा खेळ, मराठवाड्यातील आजचा हवामान अंदाज पाहिला का?
राज्यात गेल्या काही काळात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. आता दिवाळी काही दिवसांवर आली असून थंडीची चाहूल लागली आहे. मराठवाड्यात मात्र पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये.
advertisement
2/5
मराठवाड्यात दिवाळीपर्यंत पावसाचा मुक्काम राहणार असल्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आज पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. तर शनिवारी देखील काही जिल्ह्यांत तुरळक पाऊस झाला.
advertisement
3/5
छत्रपती संभाजीनगर शहरात ऑक्टोबर हिटचे चटके जाणवत आहेत. आज कमाल तापमान आज 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस एवढं असेल. तसेच आज शहरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये.
advertisement
4/5
हवामान विभागाने 28 आणि 29 ऑक्टोबर रोजी पुन्हा मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे. त्यामुळे यंदाची दिवाळीही पावसात जाणार असल्याने बळीराजा चिंतेत आहे.
advertisement
5/5
मराठवाड्यामध्ये जालना हिंगोली परभणी नांदेड बीड धाराशिव लातूर या जिल्ह्यांमध्ये देखील गेल्या दोन दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे कमालीचा उकडा आहे. पण सध्याला मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सकाळी हलकी थंडी पडायला सुरुवात झालेली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
ऊन, थंडी अन् पावसाचा खेळ, मराठवाड्यातील आजचा हवामान अंदाज पाहिला का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल