TRENDING:

Marathwada Weather Update: ऐन हिवाळ्यात विजा कडाडणार, मराठवाड्यात पावसाचा इशारा, थंडी गायब

Last Updated:
Marathwada Weather Update: मराठवाड्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. आता ऐन हिवाळ्यात हवामान विभागाने पावसाचा अलर्ट दिला आहे.
advertisement
1/4
ऐन हिवाळ्यात विजा कडाडणार, मराठवाड्यात पावसाचा इशारा, थंडी गायब
मराठवाड्यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी थंडीने चांगला जोर धरला होता. पण गेल्या 2 ते 3 दिवसांपासून थंडीची तीव्रता कमी झाली आहे. अशातच ऐन हिवाळ्यात मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये.
advertisement
2/4
धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. अचानक झालेल्या हवामान बदलांमुळे शेती पिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे.
advertisement
3/4
छत्रपती संभाजीनगरमध्ये किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. आज किमान तापमान 23 अंश तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. तर परभणी, जालना येथे देखील आज 15 अंश किमान तर 31 अंश सेल्सिअस कमाल तापमान राहील. त्यामुळे ऐन हिवाळ्यात मराठवाड्यातील लोकांना उकाड्याचा सामना करावा लागेल.
advertisement
4/4
दरम्यान, येता आठवडा मराठवाड्यावर अवकाळी संकट कायम असणार आहे. त्यानंतर पुढील आठवड्यात पुन्हा थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Weather Update: ऐन हिवाळ्यात विजा कडाडणार, मराठवाड्यात पावसाचा इशारा, थंडी गायब
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल