Marathwada Weather Update: कडाक्याच्या थंडीत अवकाळी पावसाचं संकट, धाराशिवला अलर्ट, मराठवाड्यात काय स्थिती?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Weather Forecast: मराठवाड्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. थडींचा जोर वाढलेला असतानाच आता धारशिवला पावसाचा इशारा देण्याता आलाय.
advertisement
1/5

नोव्हेंबर अखेरीस मराठवाड्यातील तापमानात मोठी घट झाली आहे. काही ठिकाणी 11 अंश सेल्सिअस पर्यंत पारा घसरला असून थंडीचा कडाका वाढला आहे. तर येत्या डिसेंबरमध्ये हवामानात मोठे बदल होण्याचे संकेत आहेत.
advertisement
2/5
मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात सकाळी दाट धुके दिसत आहे. परभणी आणि नांदेडमध्ये सर्वात कमी 12 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाची नोंद झालीये. आजही हीच स्थिती कायम राहणार असून गारठा वाढल्याने सकाळी शेकोट्या पेटल्याचे दिसत आहे.
advertisement
3/5
छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आज सकाळी धुक्याचे सावट असून आकाश ढगाळ राहणार आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस एवढं राहील.
advertisement
4/5
जालना, हिंगोली या जिल्हात किमान तापमान हे 14 अंश सेल्सिअस राहील. तर धाराशिव आणि बीड या जिल्ह्यात किमान तापमानात घट झाली असून तापमान 12 अंशांवर राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर धाराशिवमध्ये हवामानात बदल होणार असून ऐन थंडीत पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेय.
advertisement
5/5
वाढती थंडी आणि ढगाळ हवामान यांमुळे रब्बी हंगामातील पिकांना रोगराईचा धोका वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घ्याव लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Weather Update: कडाक्याच्या थंडीत अवकाळी पावसाचं संकट, धाराशिवला अलर्ट, मराठवाड्यात काय स्थिती?