कडक उन्ह अन् जोरदार पाऊस, मराठवाड्यात कसं असणार आजचं हवामान?
- Published by:News18 Marathi
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढत आहे. अशात आज पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आलाय.
advertisement
1/5

सध्या पावसाचा परतीचा प्रवास सुरू असून राज्यात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात होत आहे. गेल्या काही दिवसांत धुमाकूळ घालणारा पाऊस आता कमी झाला असून ऑक्टोबर हिटचे चटके जाणवत आहेत. तरीही आज काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
advertisement
2/5
मराठवाड्यातील काही भागात आज पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड, परभणी बीड, धाराशिव या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर लातूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
3/5
शनिवारी रात्री संभाजीनगर शहरात पावसाने हजेरी लावली. दिवसभर उन्हाचा तडाका जाणवत असताना रात्री जोरदार पाऊस झाला. अचानक होत असणाऱ्या वातावरणातील बदलांमुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या जाणवत आहेत. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.
advertisement
4/5
मराठवाड्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. सोयाबीन शेतीला या पावसाचा फटका बसला होता. आता पुन्हा पाऊस होणार असल्याना शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.
advertisement
5/5
गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात तापमानाचा पारा देखील वाढला आहे. नागरिकांना ऑक्टोबर हिटच्या झळा जाणवत असून उकाडा वाढला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज, 6 ऑक्टोबर रोजी कमाल तापमान 33 अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
कडक उन्ह अन् जोरदार पाऊस, मराठवाड्यात कसं असणार आजचं हवामान?