मराठवाड्यावर आता नवं संकट, तापमानात होतेय मोठी वाढ, पाऊसही बरसणार
- Published by:News18 Marathi
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
मराठवाड्यात परतीच्या पावसानंतर आणखी एक संकट आलंय. त्यामुळे तापमानात मोठी वाढ होत असून नागरिकांना ऑक्टोबर हिटचे चटके सहन करावे लागत आहेत.
advertisement
1/5

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा परतीचा प्रवास सुरू आहे. जाता-जाता राज्यात धुमाकूळ घातला होता. आता ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झाली असून 'ऑक्टोबर हिट'चे चटकेही राज्यात जाणवू लागले आहेत.
advertisement
2/5
मराठवाड्यात आता 'ऑक्टोबर हिट'ची तीव्रता जाणवत आहे. गेल्या 2 दिवसांत तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज 3 ऑक्टोबर रोजी कमाल तापमान 32 तर किमान 22 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
advertisement
3/5
गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सोयाबीनसह इतर पिकांच्या शेतीचेही मोठे नुकसान झाले. आता परतीच्या पावसानंतर ऑक्टोबर हिटचे चटके नागरिकांना सहन करावे लागणार आहेत.
advertisement
4/5
मराठवाड्यातील काही ठिकाणी आजही पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड बीड,लातूर,धाराशिव या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. पण परभणी जिल्ह्यातील काही भागांमध्ये 2 ऑक्टोबर रोजी पाऊस झालेला आहे.
advertisement
5/5
मराठवाड्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे तापमानामध्ये वाढ झालेली आहे. यामुळे मोठा उकाडा जाणवत आहे. येत्या काळात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
मराठवाड्यावर आता नवं संकट, तापमानात होतेय मोठी वाढ, पाऊसही बरसणार