TRENDING:

Marathwada Rain: प्रतीक्षा संपली, मराठवाड्यात 48 तास पावसाचे, जुलैच्या पहिल्याच दिवशी 5 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यातील शेतकऱ्यांची चिंता मिटणार आहे. जुलैच्या पहिल्याच दिवशी 5 जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज आहे.
advertisement
1/5
प्रतीक्षा संपली, मराठवाड्यात 48 तास पावसाचे, 1 जुलैला 5 जिल्ह्यांना अलर्ट
जून महिन्यात राज्यात मान्सूनचा जोर राहिला. मात्र, मराठवाड्यात पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते. आता जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी मराठवाडा वासियांसाठी एक चांगली बातमी आहे. पावसाची प्रतीक्षा संपणार असून मराठवाड्यात आजपासून हवा बदलणार आहे. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह 5 जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासांसाठी छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. याठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
3/5
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील 48 तासांसाठी जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. या काळात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहणार असून विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाची शक्यता आहे.
advertisement
4/5
बीड, लातूर आणि धाराशिवकरांना मात्र पुढील काही दिवस मोठ्या पावसाची वाट पाहावी लागेल. आज ढगाळ हवामानासह तुरळक हलक्या पावसाची शक्यता असली तरी हवामान विभागाने या तिन्ही जिल्ह्यांना कोणताही सतर्कतेचा इशारा दिलेला नाही.
advertisement
5/5
मराठवाड्यात पावसाने उघडीप दिल्याने खरीप हंगाम संकटात आला आहे. काही जिल्ह्यांत आज जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर 48 तासानंतर बहुतांश भागात पावसाचा जोर पुन्हा ओसरणार आहे. पुढील काही काळ हवामानाची हीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना त्यानुसार नियोजन करावे लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Rain: प्रतीक्षा संपली, मराठवाड्यात 48 तास पावसाचे, जुलैच्या पहिल्याच दिवशी 5 जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल