मराठवाड्याचा पारा चढतोय! हलक्या सरीही बरसणार, आजचं हवामान अपडेट पाहिलं का?
- Published by:News18 Marathi
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
मराठवाड्यात आता ऑक्टोबर हिटचे चटके बसत आहेत. तर काही ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
1/5

राज्यात पावसाचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. तरीही काही ठिकाणी जाता-जाता बरसत आहे. गेल्या काही काळात मराठवाड्यात जोरदार बरसणाऱ्या पावसानं आता विश्रांती घेतली असून आता ऑक्टोबर हिटचे चटके जाणवत आहेत.
advertisement
2/5
गेल्या 2 दिवसांत मराठवाड्यातील तापमानात मोठी वाढ झालीये. छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान 33 अंशांवर गेलं असून यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी शहरात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. तरीही वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता.
advertisement
3/5
छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड, परभणी बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पावसाने विश्रांती घेतलेली आहे. या जिल्ह्यातील तापमानांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तरीही या जिल्ह्यात पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
4/5
सध्या तापमानामध्ये मोठी वाढ झाल्यामुळे नागरिक उष्णतेनं त्रस्त आहेत. परतीच्या पावसाने विश्रांती घेतली असली तर दिवाळीपर्यंत अधूनमधून पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
advertisement
5/5
ऑक्टोबर महिन्यात तापमानात वाढ होत असल्याने नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. तर शेतकऱ्यांना आरोग्यासोबतच पिकांचेही व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
मराठवाड्याचा पारा चढतोय! हलक्या सरीही बरसणार, आजचं हवामान अपडेट पाहिलं का?