TRENDING:

कुठं पाऊस, तर कुठं उन्ह! मराठवाड्यातील पावसाचं आजचं अपडेट पाहिलं का?

Last Updated:
मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली आहे. आज काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
advertisement
1/5
कुठं पाऊस, तर कुठं उन्ह! मराठवाड्यातील पावसाचं आजचं अपडेट पाहिलं का?
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसानं उघडीप दिली आहे. काही ठिकाणी उन्ह आणि पावसाचा खेळ सुरू आहे. मराठवाड्यातही पावसाचा जोर कमीच आहे. आज 21 सप्टेंबर रोजी पावसाची स्थिती काय राहील? याबाबत जाणून घेऊ.
advertisement
2/5
गेल्या दोन ते दिवसांपासून शहरामध्ये पावसाने विश्रांती घेतलेली आहे. 21 सप्टेंबर रोजी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. शहरात आज कमाल तापमान 23 अंश तर किमान तापमान हे 31 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
3/5
मराठवाड्यामधील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि बीड या जिल्ह्यांमध्ये पावसाने विश्रांती घेतलेली आहे. पण या ठिकाणी देखील आज मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
advertisement
4/5
दरम्यान, मराठवाड्यात पावसानं उघडीप दिल्यानं तापमानात वाढ झाल्याचं चित्र आहे. बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा तिशी पार आहे. त्यामुळे वातावरणात उकाडा जाणवत आहे.
advertisement
5/5
शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची योग्य काळजी घ्यावी. विशेषकरून मोसंबी बागेवर रोगांचा प्रादुर्भाव जाणवत आहे. पावसाचा जोर वाढल्यास नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ते व्यवस्थापन करण्याची गरज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
कुठं पाऊस, तर कुठं उन्ह! मराठवाड्यातील पावसाचं आजचं अपडेट पाहिलं का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल