रविवारची सुट्टी पावसाला नाही! मराठवाड्यात इथं बरसणार, हवामान विभागाचा इशारा
- Published by:News18 Marathi
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
मराठवाड्यात आज पावसाचा जोर काहीसा ओसरणार आहे. तरीही तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
1/5

राज्यात परतीच्या मान्सूनचा जोर गेल्या काही दिवसांपासून कायम आहे. या मुसळधार पावसाने मराठवाड्याला झोडपून काढले आहे. आज देखील हवामान विभागाने महत्त्वाचा इशारा दिला आहे.
advertisement
2/5
28 सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. आज पुन्हा एकदा मराठवड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाये.
advertisement
3/5
छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाच्या मध्यम पावसाची शक्यता आहे. तर परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे.
advertisement
4/5
छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणारा हर्सूल तलाव देखील ओव्हर फ्लो झालेला आहे. जोरदार पाऊस झाल्यामुळे वेरूळ येथील अडगळीच्या चांगोबा धबधबा देखील वाहू लागलाय. लातूर जिल्ह्यातील मांजरा प्रकल्प मधून देखील पाण्याचं विसर्ग सुरू आहे.
advertisement
5/5
मुसळधार पावासामुळे काही शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. तर रब्बी पिकांना पाण्यासाठी काहीसा दिलासा मिळाला आहे. मराठवाड्यातील धरणे 75 टक्क्यांपर्यंत भरली आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
रविवारची सुट्टी पावसाला नाही! मराठवाड्यात इथं बरसणार, हवामान विभागाचा इशारा