TRENDING:

मराठवाड्यात पावसाची दिवाळी, आज पुन्हा जोरधार, कुठं होणार पाऊस?

Last Updated:
Weather Forecast: गेल्या काही दिवसांपासून राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. आता पाऊस माघारी फिरत असून थंडीची चाहूल लागली आहे. मराठवाड्यात मात्र पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये.
advertisement
1/5
मराठवाड्यात पावसाची दिवाळी, आज पुन्हा जोरधार, कुठं होणार पाऊस?
दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली तरी मराठवाड्यातील पावसाचा मुक्काम कायम आहे. आज मराठवाड्यातील काही भागात ढगाळ वातावरण राहणार असून तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
2/5
छत्रपती संभाजीनगर शहरात आज कमाल तापमान 33 अंश तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस एवढं असेल. गेल्या दोन दिवसापासून परतीचा पावसाने शहरात विश्रांती घेतल्यामुळे कमालीचा उकाडा जाणवत आहे. पण आज शहरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
advertisement
3/5
मराठवाड्यातील जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांमध्ये देखील गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु, आज पुन्हा पावसाची शक्यता असून शेतकरी चिंतेत आहे.
advertisement
4/5
28 ऑक्टोबर रोजी मराठवाड्यातील छ. संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असून यलो अलर्ट देण्यात आलाय. ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहतील आणि वादळी वाऱ्यासह पावासाचा अंदाज आहे.
advertisement
5/5
दरम्यान, शेतकऱ्यांनी आता रब्बी पिकातील पेरण्यांची सुरुवात केलेली आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी योग्य सल्ला घेऊनच आपली पेरणी करावी. येत्या 1 नोव्हेंबर पासून थंडी सुरू होईल, असा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
मराठवाड्यात पावसाची दिवाळी, आज पुन्हा जोरधार, कुठं होणार पाऊस?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल