TRENDING:

मराठवाड्यात परतीच्या पावासाचा जोर, दसऱ्यानंतर दिवाळी साजरी करणार पाऊस

Last Updated:
राज्यात परतीचा पाऊस पुन्हा सक्रीय झाला असून आज दसऱ्या दिवशी मराठवाड्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
advertisement
1/5
मराठवाड्यात परतीच्या पावासाचा जोर, दसऱ्यानंतर दिवाळी साजरी करणार पाऊस
राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावलीये. तर ऑक्टोबर हिटमुळे उष्णतेचा पारा चढल्याचेही चित्र आहे. परंतु, आता हवामान विभागाकडून महत्त्वाचं अपडेट आलं आहे. दसऱ्यानंतर आता परतीचा पाऊस दिवाळीही साजरी करण्याची शक्यता आहे.
advertisement
2/5
दसऱ्यानंतरही दिवाळीपर्यंत पावसाचा मुक्काम राहण्याची शक्यता आहे. पुढचे 3 दिवस राज्यात पाऊस असणार आहे. मराठवाड्यातील बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
3/5
बीड, लातूर, जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसचा अंदाज आहे. छ. संभाजीनगरमध्ये आज 30 अंश कमाल तर 22 अंश किमान तापमान असेल.
advertisement
4/5
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना आज हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
5/5
दरम्यान, परतीच्या पावसाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता पुन्हा पावासाची शक्यता असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर संकट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
मराठवाड्यात परतीच्या पावासाचा जोर, दसऱ्यानंतर दिवाळी साजरी करणार पाऊस
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल