TRENDING:

ऑक्टोबर हिटचे चटके अन् परतीचा पाऊस, मराठवाड्याला हवामान विभागाचा इशारा

Last Updated:
परतीचा पाऊस पुढील काही दिवस कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काढणीला आलेल्या पिकांची योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
advertisement
1/5
ऑक्टोबर हिटचे चटके अन् परतीचा पाऊस, मराठवाड्याला हवामान विभागाचा इशारा
राज्यात परतीच्या पावासाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून ऑक्टोबर हिटचे चटके बसत आहे. अशातच काही ठिकाणी परतीच्या पावसानेही धडक दिलीये. कमालीचा उकाडा जाणवत असतानाच आज पुन्हा एकदा काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
advertisement
2/5
मराठवाड्यातील जालना, परभणी, संभाजीनगर, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा 30-40 किमी प्रतितास वेग आणि मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
3/5
हवामान विभागाने 12 ऑक्टोबरपासूनच छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यात 5 दिवस पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार आज पुन्हा एकदा काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. संभाजीनगरमध्ये आज 29 अंश कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
4/5
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत गेल्या रविवार, सोमवार, मंगळवारीही पावसाने हजेरी लावली. दुपारपर्यंत कडक ऊन आणि सायंकाळी पाऊस असे चित्र दिसत आहे. मराठवाड्यातील तापमानाचा पारा 32 अंशांच्या पार गेला असून एकीकडे ऑक्टोबर हिटचे चटके तर एकीकडे पाऊस असे चित्र आहे.
advertisement
5/5
दरम्यान, परतीचा पाऊस पुढील काही दिवस कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काढणीला आलेल्या पिकांची योग्य ती काळजी घ्यावी लागेल. तसेच रब्बी हंगामातील मशागतीसाठीही पावसामुळे अडचणी येत आहेत. ढगाळ वातावरणाचा पिकावरही परिणाम होत आहे. विशेष करून फळबागांची काळजी शेतकऱ्यांना घ्यावी लागणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
ऑक्टोबर हिटचे चटके अन् परतीचा पाऊस, मराठवाड्याला हवामान विभागाचा इशारा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल