TRENDING:

Marathwada Weather Update: मराठवाड्यात शेकोट्या पेटल्या, इथं घसरला पारा, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?

Last Updated:
Marathwada Weather Update: गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात थंडीचा जोर वाढला आहे. काही ठिकाणी तापमानाचा पारा 12 अंशांपर्यंत घसरला आहे.
advertisement
1/5
मराठवाड्यात शेकोट्या पेटल्या, इथं घसरला पारा, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?
मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी पडायला सुरुवात झालेली आहे. मराठवाड्यातील तापमान हे 12 अंश सेल्सिअस पर्यंत घसरले आहे. पुढील काही दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
2/5
परभणी आणि बीड जिल्हात किमान तापमान हे 13 अंश सेल्सिअस असेल. थंडीसोबतच काही ठिकाणी सकाळच्या वेळी धुके पडल्याचे दिसत आहे. तर गारठ्यामुळे शेकोट्या ग्रामीण भागात शेकोट्या पेटू लागल्या आहेत.
advertisement
3/5
हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात किमान तापमान हे 14 अंश सेल्सिअस असेल. तर लातूर आणि धाराशिव या जिल्हात किमान तापमान हे 15 अंश सेल्सिअस राहील, असे हवामान खात्याने सांगितले आहे.
advertisement
4/5
छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. गरम कपडे खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.
advertisement
5/5
दरम्यान, हवामानात अचानक झालेल्या बदलांमुळे नागरिकांत आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Weather Update: मराठवाड्यात शेकोट्या पेटल्या, इथं घसरला पारा, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल