पारा घसरला, मराठवाड्यात थंडीचा जोर, आजचा हवामान अंदाज पाहिला का?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Weather Forecast: मराठवाड्यात थंडीची तीव्रता वाढत असून दुपारी उन्हाचे चटके जाणवत आहेत. आज हवामान कसं राहील? जाणून घेऊ.
advertisement
1/5

राज्यातील तापमानामध्ये सतत बदल होताना दिसत आहेत. राज्यात काही ठिकाणी थंडी तर काही ठिकाणी कडक ऊन अशी स्थिती आहे. मराठवाड्यातील वातावरणात देखील मोठे बदल जाणवत आहेत.
advertisement
2/5
मराठवाड्यात थंडीचा जोर वाढला आहे. बहुतांश जिल्ह्यांत पारा 17 अंशांपर्यंत खाली आला आहे. तर दुपारी उष्णतेचे चटके जाणवत आहेत.
advertisement
3/5
छत्रपती संभाजीनगर शहराचे कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस एवढं असेल. शहरात देखील थंडीचा जोर वाढला असून लोक थंडीचे कपडे खरेदी करताना दिसत आहेत
advertisement
4/5
जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यात देखील थंडीची तीव्रता वाढत आहे. या संपूर्ण जिल्ह्यातील तापमानामध्ये मोठी घट झालेली आहे. धाराशिव, लातूर या जिल्ह्यातील आता तापवण्यात मोठी घट झालेली आहे.
advertisement
5/5
मराठवाड्यात पुढील काही दिवसांत थंडीची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फळबागांन जपावं लागणार आहे. तसेच आरोग्याची देखील योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
पारा घसरला, मराठवाड्यात थंडीचा जोर, आजचा हवामान अंदाज पाहिला का?