TRENDING:

दिवाळीनंतर वारं फिरलं, तुळशीच्या लग्नाला हुडहुडी, मराठवाड्यातील हवामान अंदाज

Last Updated:
Weather Forecast: राज्यात दिवाळीनंतर वातावरणात बदल जाणवत आहेत. मराठवाड्यात पारा घसरला असून आज हवामानाची स्थिती कशी असेल? जाणून घेऊ.
advertisement
1/5
दिवाळीनंतर वारं फिरलं, तुळशीच्या लग्नाला हुडहुडी, मराठवाड्यातील हवामान अंदाज
दिवाळीनंतर हवामानात सतत बदल होताना दिसत आहेत. मराठवाड्यात देखील वातावरण बदललं असून पावसाने विश्रांती घेतलीये. तर थंडीचा जोर वाढला आहे. मराठवाड्याचं आज तुळशी विवाहाच्या दिवशीचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी आकाश निरभ्र राहणार आहे. थंडीची तीव्रता वाढली असून तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी तापमानाचा पारा 16 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे.
advertisement
3/5
छत्रपती संभाजीनगर शहरातील तपमानात देखील मोठीं घट झालेली आहे. शहराचे कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस एवढं असेल. थंडी वाढल्याने शहरातील लोक थंडीपासून संरक्षणासाठी स्वेटर आणि इतर साहित्य खरेदी करताना दिसत आहेत.
advertisement
4/5
जालना, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यात देखील थंडी वाढली आहे. परभणीत कमाल तापमान हे 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस एवढं असेल. तर लातूरमध्ये कामल तापमान 31 तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस एवढं असेल.
advertisement
5/5
दरम्यान, वातावरणातील बदलांचा शेती क्षेत्राला फटका बसत आहे. तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव जाणवत असून शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे. तर रात्री थंडीचा कडाका आणि दुपारी उन्हाचा तडाखा अशा विचित्र हवामान स्थितीमुळे आरोग्याची काळजी देखील घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
दिवाळीनंतर वारं फिरलं, तुळशीच्या लग्नाला हुडहुडी, मराठवाड्यातील हवामान अंदाज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल