Marathwada Weather Update: मराठवाड्यात हुडहुडी, परभणीत थंडीचा कडाका, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Marathwada Weather Update: राज्यात गेल्या काही दिवसांत हवामानात मोठे बदल जाणवत असून मराठवाड्यात थंडीचा जोर वाढला आहे.
advertisement
1/5

राज्यात गेल्या काही दिवसांत हवामानात मोठे बदल झाले असून थंडीचा कडाका वाढला आहे. मराठवाड्यात देखील पारा घसरला असून काही ठिकाणी तापमान 11 अंशांपर्यंत घसरले आहे.
advertisement
2/5
मराठवाड्यात आज हवामान कोरडे राहणार असून थंडीचा जोर कायम आहे. परभणीत सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून आज देखील पारा 11 अंशांवर राहणार आहे.
advertisement
3/5
बीड, हिंगोली आणि नांदेड मध्ये किमान तापमानात मोठी घट झाली असून ते 12 अंश सेल्सिअस असेल. धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यामध्ये किमान तापमान 13 अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर सर्वच जिल्ह्यांत हवामान कोरडं राहील.
advertisement
4/5
छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील गारठा वाढला असून किमान तापमान 12 अंशांपर्यंत घसरलं आहे. शहरात सकाळच्या वेळी धुकं पडत असून दिवसभर आकाश सूर्यप्रकाशित राहत आहे.
advertisement
5/5
दरम्यान, पुढील काही दिवस हवामानाची हिच स्थिती मराठवाड्यात कायम राहणार आहे. अचानक वाढलेल्या थंडीमुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. तसेच शेतकऱ्यांना शेती पिकांची योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Weather Update: मराठवाड्यात हुडहुडी, परभणीत थंडीचा कडाका, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?