TRENDING:

मराठवाड्यात शेकोट्या पेटल्या, हवामानात मोठ्या बदलांची शक्यता, पाहा आजचा अंदाज

Last Updated:
Weather Forecast: मराठवाड्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. आज विविध जिल्ह्यांतील हवामान स्थिती काय राहील? याबाबत जाणून घेऊ.  
advertisement
1/5
मराठवाड्यात शेकोट्या पेटल्या, हवामानात मोठ्या बदलांची शक्यता, पाहा आजचा अंदाज
राज्यातील जनतेला दुहेरी संकटाचा सामना करावा लागणार आहे. आज कुठं थंडीचा जोर वाढला आहे, तर कुठं जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मराठवाड्यात मात्र हवामानाची वेगळी स्थिती आहे.
advertisement
2/5
मराठवाड्यात थंडीचा जोर कायम असून काही ठिकाणी पारा 18 अंशांपर्यंत घसरला आहे. तर तापमान तिशी पार कायम आहे. त्यामुळे रात्री थंडी तर दिवसा कडक ऊन अशी स्थिती जाणवत आहे.
advertisement
3/5
छत्रपती संभाजीनगर शहरातील तापमानात देखील मोठी घट झालेली आहे. शहराचे कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस एवढं असेल. शहरात पावसाची कोणतीही शक्यता नाही.
advertisement
4/5
जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यात देखील तापमानात घट झालेली आहे. या जिल्ह्यांत किमान तापमान 18 अंश सेल्सिअस एवढे आहे. तर हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात किमान तापमान हे 19 अंश सेल्सिअस आहे. पुढील काही दिवसांत तापमानात पुन्हा घट होण्याची शक्यता आहे.
advertisement
5/5
दरम्यान, मराठवाड्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. ग्रामीण भागात थंडीचा जोर वाढल्याने शेकोट्या पेटायला सुरुवात झाली आहे. तर थंडीमुळे आरोग्याचे प्रश्न देखील निर्माण होत आहेत. तसेच शेतकऱ्यांना पिकांची देखील काळजी घ्यावी लागणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
मराठवाड्यात शेकोट्या पेटल्या, हवामानात मोठ्या बदलांची शक्यता, पाहा आजचा अंदाज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल