TRENDING:

आरोग्य सांभाळा! मराठवाड्यात गारठा वाढला, या 2 जिल्ह्यांत सर्वात कमी तापमान

Last Updated:
Weather Forecast: मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असून पुढील काही दिवस तीव्रता कायम असणार आहे. आज हवामानाची स्थिती काय राहील? जाणून घेऊ.
advertisement
1/5
आरोग्य सांभाळा! मराठवाड्यात गारठा वाढला, या 2 जिल्ह्यांत सर्वात कमी तापमान
राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. पुढील काही दिवस थंडीचा जोर वाढणार आहे. मराठवाड्यातील तापमानातही मोठी घट झाली असून गारठा वाढला आहे.
advertisement
2/5
मराठवाड्यातील तापमानाचा पारा चांगलाच घसरला असून काही ठिकाणी 13 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झालीये. आज परभणी आणि बीड जिल्ह्यामध्ये सर्वात कमी तापमान तापमान 14 अंश सेल्सिअस एवढं असेल.
advertisement
3/5
छत्रपती संभाजीनगरमध्ये पारा 15 अंशांपर्यंत घसरला आहे. तर कमाल तापमान 31 अंशांच्या पार कायम आहे. त्यामुळे पहाटे आणि रात्री थंडी तर दुपारी कडक ऊन जाणवत आहे.
advertisement
4/5
जालना, हिंगोली, लातूर, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यात देखील किमान तापमान 16 अंश सेल्सिअस एवढे असेल. पुढील आठवड्यात तापमानामध्ये अजून घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
5/5
हवामानातील बदलांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच रब्बी हंगामातील पेरणी शेतकऱ्यांनी लवकर पूर्ण करावी. तसेच आरोग्याची देखील काळजी घेण्याची गरज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
आरोग्य सांभाळा! मराठवाड्यात गारठा वाढला, या 2 जिल्ह्यांत सर्वात कमी तापमान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल