TRENDING:

Marathwada Weather Update: मराठवाड्यात थंडीची लाट ओसरली, बीडचा पारा खालीच, आज काय स्थिती?

Last Updated:
Marathwada Weather Update: मराठवाड्यातील थंडीची लाट ओसरली असली तरी गारठा कायम आहे. आजच्या हवमान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
1/5
मराठवाड्यात थंडीची लाट ओसरली, बीडचा पारा खालीच, आज काय स्थिती?
गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात थंडीची लाट निर्माण झाली होती. अनेक ठिकामी तापमानाचा पारा 9 अंशांच्या खाली घसरला होता. आता मात्र हवामानात मोठे बदल जाणवत आहेत.
advertisement
2/5
मराठवाड्यातील थंडीची लाट ओसरली असून किमान तापमानात वाढ झाली आहे. तरीही हवेतील गारठा कायम आहे. येत्या आठवड्यात पुन्हा थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
3/5
बीडमध्ये सर्वात कमी तापमान 14 अंश सेल्सिअसपर्यंत राहणार आहे. या ठिकाणी आज हवामान कोरडे असेल. परभणी आणि धाराशिव मध्ये किमान तापमान 17 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
4/5
नांदेड आणि हिंगोलीमध्ये किमान तापमान 18 अंश तर लातूर जिल्ह्यात 19 अंश सेल्सिअस राहील. या ठिकाणी तापमानात वाढ झाली असून नागरिकांना उकाडा जाणवत आहे. आज देखील हवामान कोरडे राहणार असून सकाळी आणि रात्री थंडी जाणवेल.
advertisement
5/5
मराठवाड्याची राजधानी मानले जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये किमान तापमानात वाढ झाली असून आज 17 अंश सेल्सिअस राहील. तर कमाल तापमान 30 अंशांच्या घरात राहण्याचा अंदाज आहे. सकाळी धुके आणि हवामान कोरडे असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Weather Update: मराठवाड्यात थंडीची लाट ओसरली, बीडचा पारा खालीच, आज काय स्थिती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल