Marathwada Weather Update: थंडीच्या मोसमात घामाच्या धारा, हिंगोलीत पारा चढला, मराठवाड्यात काय स्थिती?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Marathwada Weather Update: मराठवाड्यातील थंडीची लाट ओसरली असून बहुतांश ठिकाणी धुक्याचे सावट आणि ढगाळ हवामान राहणार आहे.
advertisement
1/5

डिसेंबर महिन्यात राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. गेल्या काही दिवसांत मराठवाड्यातील थंडीची लाट ओसरली असून किमान तापमानात वाढ झालीये. मराठवाड्यातील हवामानाच्या आजच्या स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
2/5
परभणी आणि धाराशिव मध्ये किमान तापमान हे 16 अंश सेल्सिअस एवढे असेल. या ठिकाणी आज ढगाळ वातावरण असेल. पण रात्रीचा वेळी मात्र थंडी राहील. बीडमध्ये किमान तापमान 18 अंश सेल्सिअस राहणार अशून हवामान कोरडे असेल.
advertisement
3/5
नांदेडमध्ये थंडीचा कडाका जाणवत असून किमान तापमान 15 अंश सेल्सिअस राहील. तर हिंगोलीत पारा चढला असून किमान तापमान 20 अंशांवर गेलंय. लातूरमध्ये देखील थंडीचा जोर ओसरला आहे.
advertisement
4/5
मराठवाड्यातील प्रमुख शहर असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथे देखील थंडीची तीव्रता कमी झालीये. आज किमान तापमान 18 अंशांवर राहील. तर सकाळच्या वेळी धुक्याचे सावट आणि ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
5/5
मराठवाड्यातील हवामानात पुढील काही दिवसांत आणखी बदलांची शक्यता आहे. सतत बदलणाऱ्या हवामानाचा फटका शेती पिकांना बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची योग्य ती काळजी घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Weather Update: थंडीच्या मोसमात घामाच्या धारा, हिंगोलीत पारा चढला, मराठवाड्यात काय स्थिती?