TRENDING:

Marathwada Weather Update: मराठवाड्यात पुन्हा अवकाळी संकट, या जिल्ह्यांत पावसाची शक्यता, आजचं हवामान अपडेट

Last Updated:
Marathwada Weather Update: मराठवाड्यातील हवामानात पुन्हा बदल जाणवत असून आज बहुतांश जिल्ह्यांत ढगाळ हवामान राहणार आहे. तर काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
advertisement
1/5
मराठवाड्यात पुन्हा अवकाळी संकट, या जिल्ह्यांत पावसाची शक्यता, आजचं हवामान अपडेट
मराठवाड्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. आज मराठवाड्यात सकाळी स्वच्छ आणि सूर्यप्रकाशित वातावरण राहील. दुपारी आणि संध्याकाळी काही जिल्ह्यांत ढगाळ हवामान अनुभवायला मिळेल. काही भागांत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
advertisement
2/5
मराठवाड्यातील तापमानात वाढ झालीये. आज मोठ्या प्रमाणावर चढ-उतार होणार नाही. मात्र वातावरण थोडे उबदार आणि दमट राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
3/5
आज छत्रपती संभाजीनगरसह बीड, लातूर, जालना या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे. तर धाराशिव, हिंगोली, नांदेडमध्ये पावसाची शक्यता कमी असून परभणीत पावासाचा अंदाज नाही.
advertisement
4/5
मराठवाड्यातील हवामान आज आद्रतेच्या दृष्टीने मध्यम स्वरूपाचे राहील. सकाळी आद्रता सुमारे 65-70 टक्के असेल तर दुपारनंतर ती 50 टक्क्यांपर्यंत कमी होईल. वाऱ्याचा वेग साधारण 10-12 किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
advertisement
5/5
मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता असलेल्या शेतकऱ्यांनी कापणी केलेल्या पिकांचे संरक्षण करावे. रस्त्यांवरील प्रवास करताना काळजी घ्यावी, पावसामुळे रस्ते ओले होऊ शकतात, त्यामुळे रस्त्यांवरून प्रवास करताना काळजी घ्यावी. तसेच आद्रतेमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता असून आरोग्याची काळजी घेणं देखील गरजेचं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Weather Update: मराठवाड्यात पुन्हा अवकाळी संकट, या जिल्ह्यांत पावसाची शक्यता, आजचं हवामान अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल