TRENDING:

मराठवाड्यात शेकोट्या पेटल्या, या जिल्ह्यात पारा घसरला, पाहा आजचं अपडेट

Last Updated:
Weather Forecast: मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असून तापमानात मोठी घट झालीये. आज हवामानाची स्थिती काय राहील? जाणून घेऊ.
advertisement
1/5
मराठवाड्यात शेकोट्या पेटल्या, या जिल्ह्यात पारा घसरला, पाहा आजचं अपडेट
राज्यात नोव्हेंबर अखेर गारठा वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी उष्मतेचा पारा 10 अंशांपर्यंत घसरला आहे. मराठवाड्यात देखील तापमानात मोठी घट झाली असून काही ठिकाणी 12 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झालीये.
advertisement
2/5
मराठवाड्यात येत्या आठवाड्यात थंडीची तीव्रता कायम असून डिसेंबरमध्ये गारठा आणखी वाढण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहणार असून पुढील काही दिवस पावसाची कोणतीही शक्यता नाही.
advertisement
3/5
मराठवाड्यातील किमान हे तापमान 12 अंश सेल्सिअसपर्यंत घसरलं आहे. सोमवारी परभणी जिल्ह्यात सर्वात कमी तापमानची नोंद झाली होती. आज संभाजीनगरमध्ये सर्वात कमी तापमान राहणार असून किमान तापमान 12 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
4/5
छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 29 अंशांवर असून किमान तापमान 12 अंश सेल्सिअस राहणार आहे. तर परभणीत किमान तापमान 13 अंश सेल्सिअस राहील. जालना, हिंगोली या जिल्ह्यांत 14 तर बीड, लातूर, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यात देखील किमान तापमान 16 अंश सेल्सिअस एवढं असेल.
advertisement
5/5
मराठवाड्यात थंडीची तीव्रता वाढल्याने सकाळी शेकोट्या पेटल्या आहेत. तर हवामानातील बदलांमुळे आरोग्याचीही काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच शेतकऱ्यांना पिकांची योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
मराठवाड्यात शेकोट्या पेटल्या, या जिल्ह्यात पारा घसरला, पाहा आजचं अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल