Marathwada Weather Update: पुढील 2 दिवस महत्त्वाचे, संभाजीनगरला पावसाचा अलर्ट, मराठवाड्यात कशी असेल स्थिती?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
Marathwada Weather Update: राज्यावर अवकाळी संकट घोंघावत असताना मराठवाड्यातील हवामानातही बदल जाणवत आहेत. पुढील 2 दिवस मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये.
advertisement
1/5

डिसेंबर अखेर राज्यावर अवकाळी पावसाचं संकट घोंघावत आहे. मराठवाड्यातील हवामानात देखील बदल जाणवत आहेत. आज मराठवाड्यात आकाश निरभ्र राहणार असून मध्यम तापमानासह उबदार आणि सूर्यप्रकाशित हवामान राहील.
advertisement
2/5
छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव आणि नांदेडसह महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांचा समावेश असलेल्या मराठवाड्यात सुमारे 29 अंश सेल्सिअस कमाल तर 23 अंश सेल्सिअस किमान तापमान राहील. तर हवेतील आद्रतेचं प्रमाण 67 टक्क्यांवर असेल.
advertisement
3/5
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर तेथील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतके राहील.
advertisement
4/5
28 डिसेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीये. तसेच डिसेंबरअखरे मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात देखील मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.
advertisement
5/5
दरम्यान, हवामानात सातत्याने होणाऱ्या बदलांचा फटका शेती पिकांना बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल. तसेच नागरिकांना आरोग्य देखील जपावं लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Weather Update: पुढील 2 दिवस महत्त्वाचे, संभाजीनगरला पावसाचा अलर्ट, मराठवाड्यात कशी असेल स्थिती?