TRENDING:

उन्हाचा तडाखा की थंडीचा कडाका? मराठवाड्यातील आजचा हवामान अंदाज

Last Updated:
Weather Forecast: राज्यात दिवाळीनंतर थंडीचा जोर वाढत आहे. मराठवाड्यात उन्हाचा तडाखा अन् थंडीचा कडाका दिसत आहे. आज हवामान स्थिती काय राहील? याबाबत जाणून घेऊ.
advertisement
1/5
उन्हाचा तडाखा की थंडीचा कडाका? मराठवाड्यातील आजचा हवामान अंदाज
दिवाळीनंतर राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. मराठवाड्यात देखील गेल्या काही दिवसांत थंडीचा जोर वाढत आहे. तसेच दुपारी कडक उन्ह पडत असून उष्णतेमुळं नागरिक हैराण आहेत.
advertisement
2/5
मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात सूर्यप्रकाश राहणार आहे. पहाटे आणि रात्री थंडी तर दुपारी उष्णतेची तीव्रता जाणवत आहे. आजही हीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
3/5
छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यतः निरभ्र आकाश राहून कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांमध्ये किमान तापमानामध्ये थोडीशी वाढ होण्याची शक्यता आहे.
advertisement
4/5
जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यात देखील आता थंडी पडायला सुरुवात झालेली आहे. परभणी हिंगोली आणि जालना या जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये थंडीचा जोर वाढला असून रात्री आणि सकाळी मोठ्या प्रमाणात थंडी जाणवत आहे.
advertisement
5/5
हवामानातील बदलांचा विचार करता शेतकऱ्यांना आपल्या पिकांची काळजी घ्यावी लागणार आहे. तूर पिकावर रोग पडल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती फवारणी करावी. तसेच ऊन आणि थंडीमुळे विविध आजार डोके वर काढत असून नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
उन्हाचा तडाखा की थंडीचा कडाका? मराठवाड्यातील आजचा हवामान अंदाज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल