तापमानात मोठी घट, मराठवाड्यात थंडीचा जोर वाढला, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Weather Forecast: मराठवाड्यात थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. काही ठिकाणी तापमानाचा पारा 16 अंशांपर्यंत खाली आला असून आजच्या हवामानाबाबत जाणून घेऊ.
advertisement
1/5

दिवाळीनंतर राज्यातील तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या बहुतांश जिल्ह्यात रात्री थंडी तर दिवसा कडक ऊन असे चित्र असून पुढील काही दिवसांत थंडीचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
2/5
मराठवाड्यात देखील तापमानाचा पारा घसरला आहे. किमान तापमानात 16 अंशापर्यंत घट जाली असून थंडीची हुडहुडी वाढली आहे. पुढील काही काळ हीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.
advertisement
3/5
छत्रपती संभाजीनगर शहराचे कमाल तापमान आज 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस एवढं असेल. संभाजीनगर मध्ये दिवसभर उन्हाचा तडाका जाणवत आहे. तर रात्री आणि सकाळी थंडीने जोर धरायला सुरुवात केलेली आहे.
advertisement
4/5
जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यात देखील थंडीचा कडाका वाढला आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी ठीकठिकाणी शेकोट्या पेटण्यास सुरुवात झाली आहे. स्वेटर, गरम कपड्यांच्या मार्केटमध्येही आता गर्दी होत आहे.
advertisement
5/5
शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची योग्य ती काळजी घ्यावी. तुरीच्या पिकावर रोगांचा प्रादुर्भावाची शक्यता असून त्यावर वेळोवेळी फवारणी करावी. त्यासोबतच फळबागांची देखील काळजी घ्यावी लागणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
तापमानात मोठी घट, मराठवाड्यात थंडीचा जोर वाढला, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?