TRENDING:

तो पुन्हा येणार! मराठवाड्यात जोरदार पावसाचा अंदाज, हवामान विभागाचा अलर्ट

Last Updated:
Weather Forecast: राज्यात हवामानाची विचित्र स्थिती जाणवत असून ऊन, थंडी आणि पाऊस एकत्रच आहेत. मराठवाड्यात देखील आज पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये.
advertisement
1/5
तो पुन्हा येणार! मराठवाड्यात जोरदार पावसाचा अंदाज, हवामान विभागाचा अलर्ट
दिवाळीच्या मोसमात देखील राज्यात पावसाचा जोर दिसत आहे. विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाने हजेरी लावलीये. आज पुन्हा मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.
advertisement
2/5
यंदा मराठवाड्यातील जनतेच्या दिवाळीवर पावसाचे सावट आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. जालना, बीड आणि धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर लातूर, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
3/5
सध्या मराठवाड्यातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये सकाळी थंडी वाजायला सुरुवात होतेय. पण दिवसभर उन्हाचा तडाका जाणवत आहे.  छत्रपती संभाजीनगर शहराचे कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस एवढं असेल.
advertisement
4/5
ऐन दिवाळीत ऊन, थंडी आणि पावसाचा जोर असल्याने विचित्र हवामान स्थितीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये देखील पावसाची शक्यता आहे.
advertisement
5/5
पुन्हा पावसाच्या शक्यतेमुळे शेतकरी चिंतेत आहे. शेतकऱ्यांना तूर पिकाची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच फळबागांची देखील योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
तो पुन्हा येणार! मराठवाड्यात जोरदार पावसाचा अंदाज, हवामान विभागाचा अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल