TRENDING:

राज्यातील या भागात पुन्हा पाऊस, मराठवाड्यात काय स्थिती? आजचा हवामान अंदाज

Last Updated:
Weather Forecast: राज्यातील काही भागात पुन्हा पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मराठवाड्यात हवामनाची आज काय स्थिती राहील? जाणून घेऊ.
advertisement
1/5
राज्यातील या भागात पुन्हा पाऊस, मराठवाड्यात काय स्थिती? आजचा हवामान अंदाज
राज्यात पुन्हा एकदा विचित्र हवामान स्थिती निर्माण झालीये. सर्वत्र थंडीचा जोर वाढत असतानाच कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, मराठवाड्यातील वातावरणात वेगळेच चित्र जाणवत आहे.
advertisement
2/5
मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत तापमानाचा पारा घसरला आहे. काही ठिकाणी तापमान 17 अंशाच्या खाली आलेलं आहे. रात्री हवेत गारवा वाढण्यास सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील तापमानात देखील मोठीं घट झालेली आहे. शहराचे कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस एवढं असेल.
advertisement
3/5
जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यात देखील थंडीची तीव्रता वाढली आहे. या संपूर्ण जिल्ह्यातील तापमानामध्ये मोठी घट झालेली आहे. हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांतील किमान तापमान हे 17 अंश सेल्सिअस इतके असणार आहे.
advertisement
4/5
परभणी, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यातील देखील किमान तापमान 18 अंश सेल्सिअस एवढे आहे. सकाळच्या वेळी थंडीने जोर धरला आहे. त्यातच तापमानात पुन्हा घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वेटरसह थंडीपासून संरक्षणाची साधने वापरण्यास सुरुवात केलीये.
advertisement
5/5
पुढील काही दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांनी शेती पिकांची काळाजी घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
राज्यातील या भागात पुन्हा पाऊस, मराठवाड्यात काय स्थिती? आजचा हवामान अंदाज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल