काळजी घ्या! मराठवाड्यात पारा घसरला, परभणीत हंगामातील सर्वात कमी तापमान
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Weather Forecast: गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात थंडीचा कडाका वाढला असून तापमानात मोठी घट झालीये. आज हवामानाची स्थिती काय राहील? जाणून घेऊ.
advertisement
1/5

राज्यात नोव्हेंबर अखेर पारा घसरला आहे. नाशिक, पुण्यासह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमान 10 अंशांपर्यंत घसरलं होतं. आता येत्या आठवड्याता थंडीचा कडाका कायम राहणार असून आणखी गारठा वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
2/5
मराठवाड्यात सर्वात कमी तापमानाची नोंद छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली होती. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज किमान तापमान 11 अंश राहणार असून कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस राहील. सकाळी शहरात धुक्याचे सावट असणार आहे. वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे.
advertisement
3/5
यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद मराठवाड्यात झालीये. आज परभणीचा पारा घसरला असून किमान तापमान 8 अंश सेल्सिअसवर आलं आहे. डिसेंबरमध्ये आणखी तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
4/5
जालना, हिंगोली आणि लातूर या जिल्हाचे तापमान हे 13 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. तर बीड, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यात देखील किमान तापमान 14 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
5/5
मराठवाड्यात 1 डिसेंबरपासून पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तसेच शेतकऱ्यांना शेती पिकांचं योग्य ते व्यवस्थापन करावं लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
काळजी घ्या! मराठवाड्यात पारा घसरला, परभणीत हंगामातील सर्वात कमी तापमान