TRENDING:

थंडीच्या मोसमात पावसाचा जोर, मराठवाड्यात विचित्र हवामान स्थिती, आजचं अपडेट

Last Updated:
Weather Forecast: ऐन दिवाळीत मराठवाड्यातील वातावरणात मोठे बदल दिसत आहेत. आता थंडीची तीव्रता वाढत असून ऊन आणि पावसाचाही जोर आहे.
advertisement
1/5
थंडीच्या मोसमात पावसाचा जोर, मराठवाड्यात विचित्र हवामान स्थिती, आजचं अपडेट
राज्यात दिवाळी सुरू झाली तरी हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. अद्याप काही भागात आतषबाजी सुरूच आहे. आजपासून पुढील 3 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक पावसाची शक्यता आहे.
advertisement
2/5
मराठवाड्यातील दिवाळीवर पाऊस आणि उष्णतेचं सावट असणार आहे. ऐन दिवाळीत काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज बहुतांश भागात ढगाळ वातावरण जाणवेल.
advertisement
3/5
परभणी, हिंगोली,जालना, छ. संभाजीनगरमध्ये पुढील 3 दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यात ऑक्टोबर हिट देखील जाणवेल. छ. संभाजीनगरमध्ये 30 अंश सेल्सिअस कमाल तर 23 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
4/5
नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर बीड, परभणी, जालना या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहील.
advertisement
5/5
सध्या संपूर्ण मराठवाड्यात रात्रीच्या वेळी आणि सकाळी थंडी जाणवत आहे. पण दिवसभर कडक ऊन पडत आहे. ऊन, पाऊस आणि थंडी अशा विचित्र हवामान स्थितीचा शेतकऱ्यांना फटका बसतोय. त्यामुळे पिकांची योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
थंडीच्या मोसमात पावसाचा जोर, मराठवाड्यात विचित्र हवामान स्थिती, आजचं अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल