TRENDING:

उन्हाचे चटके अन् थंडीचा कडाका, मराठवाड्यात विचित्र हवामान, जनता हैराण

Last Updated:
Weather Forecast: राज्यातून परतीच्या पावसाने विश्रांती घेतली आहे. परंतु, ऊन आणि थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. मराठवाड्यातील आजच्या हवामान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
1/5
उन्हाचे चटके अन् थंडीचा कडाका, मराठवाड्यात विचित्र हवामान, जनता हैराण
दिवाळीनंतर राज्यातून पावसाने माघार घेतली आहे. त्यातच आता थंडीचा चाहुल लागली असून थंडीचा जोर वाढत आहे. परंतु, मराठवाड्यात पहाटे थंडी आणि दुपारी उन्हाचे चटके जाणवत आहेत.
advertisement
2/5
मराठवाड्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. आता कमाल आणि किमान तापमानात मोठा फरक दिसत असून कमाल तापमान 33 अंशांच्या घरात तर किमान तापमान निम्म्यावर म्हणजे 16 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आहे.
advertisement
3/5
छत्रपती संभाजीनगर शहराचे कमाल तापमान आज 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस एवढं असेल. त्यामुळे संभाजीनगरमध्येही थंडीचा जोर वाढत आहे. तसेच मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत देखील थंडी जाणवत आहे.
advertisement
4/5
जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यात देखील तापमानात घट झाली असून थंडी पडायला सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पेरणीला सुरुवात केलेली आहे.
advertisement
5/5
दरम्यान, कमाल आणि किमान तापमानातील फरकामुळे मराठवाड्यात पहाटे हुडहुडी तर दुपारी उन्हाचे चटके अशी स्थिती आहे. वातावरणातील विचित्र स्थितीमुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
उन्हाचे चटके अन् थंडीचा कडाका, मराठवाड्यात विचित्र हवामान, जनता हैराण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल